उन्हाळी हंगामासाठी नेरमधून पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:13 IST2021-03-04T05:13:30+5:302021-03-04T05:13:30+5:30

पुसेगाव : खटाव तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या ब्रिटिशकालीन नेर धरणातून उन्हाळी हंगामासाठी सोमवार,दि. १ रोजी पाणी सोडण्यात आले. सध्या धरणात ...

Released water from Ner for summer season | उन्हाळी हंगामासाठी नेरमधून पाणी सोडले

उन्हाळी हंगामासाठी नेरमधून पाणी सोडले

पुसेगाव : खटाव तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या ब्रिटिशकालीन नेर धरणातून उन्हाळी हंगामासाठी सोमवार,दि. १ रोजी पाणी सोडण्यात आले. सध्या धरणात ७५ टक्के पाणीसाठा असल्याने एक महिना सलग पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

नेर धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन आणि सर्व कॅनॉलची दुरुस्ती करूनही रब्बी हंगामासाठी पाणी मागणी अर्ज आले नाहीत. आता उन्हाळी हंगामासाठी शेतकऱ्यांनी अर्ज भरून पाण्याची मागणी केली आहे. त्यानुसार सोमवारी सायंकाळी नेर धरणातून थेट येरळा नदीत तसेच नेर मुख्य कालव्यातून राम ओढा आणि खातगुण येथील नदीवरील बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले आहे. या सोडलेल्या पाण्याचा नेर, पुसेगाव, काटकरवाडी, खातगुण, भांडेवाडी, खटाव, सिद्धेश्वर कुरोली आणि भुरकवडी या भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

चौकट...

अर्ज भरून सहकार्य करा...

उन्हाळी हंगामासाठी नेर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. सोडलेल्या पाण्याचा लाभ बागायती क्षेत्राला होणार आहे. विहिरींची पाणीपातळी वाढणार आहे. येरळा नदीकाठच्या गावांमधील शेतकऱ्यांनी अधिकाधिक पाणी मागणी अर्ज भरून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते आणि पाटबंधारे विभागाचे कालवा निरीक्षक अमोल लेंभे यांनी केले आहे.

०३पुसेगाव

फोटो : नेर (ता. खटाव) येथे नेर धरणातून उन्हाळी हंगामासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी पाणी सोडले.

Web Title: Released water from Ner for summer season