शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सांगलीसाठी कोयनेतून पाणी मागणीत वाढ, विसर्ग वाढवला; धरणात किती पाणीसाठा शिल्लक..जाणून घ्या

By नितीन काळेल | Updated: April 20, 2024 11:30 IST

एक जूनपर्यंत पाण्याचे नियोजन करावे लागणार

सातारा : सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी मागणी वाढल्यामुळे कोयना धरणातून विसर्ग वाढविण्यात आला असून विमोचक द्वारमधून आता १२०० क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे सांगलीसाठी आता पायथा वीजगृह आणि विमोचक द्वार असा मिळून ३ हजार ३०० क्यूसेकने विसर्ग सुरू झाला आहे. तर धरणात सध्या ४३ टीएमसीच साठा शिल्लक आहे.कोयना धरणाचीपाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती केली जाते. तसेच सिंचन आणि पिण्याच्या पाणी योजनांसाठीही धरणातून विसर्ग केला जातो. यामध्ये सांगली जिल्ह्यातील अधिक करुन सिंचन पाणी योजनांचा समावेश आहे. त्यातच गेल्यावर्षी सातारा जिल्ह्यात अपुरे पर्जन्यमान झाले होते. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे धरण भरले नव्हते. धरणातील पाणीसाठा ९५ टीएमसीपर्यंतच पोहोचलेला. त्यामुळे गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पाण्याची मागणी होत होती. मागणी आणि तरतुदीनुसार सांगलीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. मागील पाच महिन्यांपासून हे पाणी मागणीनुसार सोडले जात आहे.

सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी ९ वाजता धरणाच्या विमोचक द्वारमधील विसर्ग ९०० वरुन १२०० क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. तसेच धरणाच्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू आहेत. त्यामधूनही २१०० क्यूसेक विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे सध्या सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी ३ हजार ३०० क्यूसेक पाणी विसर्ग होत आहे. हे सर्व कोयना नदीतून पुढे जात आहे.दरम्यान, कोयना धरणात शनिवारी सकाळच्या सुमारास ४२.९३ टीएमसी पाणीसाठा होता. अजुनही धरणात ४०.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एक जूनपर्यंत कोयनेतील पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. त्यानंतर नवीन तांत्रिक वर्ष सुरू होते. याचदरम्यान, कोयना धरण विभागातही पावसाला सुरूवात होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगलीKoyana Damकोयना धरणWaterपाणी