फलटणमधून गायींची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:37 IST2021-03-24T04:37:21+5:302021-03-24T04:37:21+5:30
फलटण : फलटण शहर पोलिसांनी फलटण येथील कुरेशीनगर येथे छापा टाकून गोमांस तसेच १६ गोवंशीय जातीची लहान व २ ...

फलटणमधून गायींची सुटका
फलटण : फलटण शहर पोलिसांनी फलटण येथील कुरेशीनगर येथे छापा टाकून गोमांस तसेच १६ गोवंशीय जातीची लहान व २ मोठी जनावरे, पाण्याचा टॅंकर असा एकूण ७ लाख ४४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार व फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल अतुल बडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फलटण शहरातील कुरेशी नगरमध्ये सोमवार, दि. २२ रोजी रात्री साडेआठ वाजता जमील कुरेशी, शाहरुख कुरेशी, मुबारक हनिफ कुरेशी, अजीम शरीफ कुरेशी, इरफान याकुब कुरेशी (सर्व रा. कुरेशीनगर फलटण) तसेच टँकर मालक यांनी गो वंशीय जातीची जनावरे कत्तल करून तसेच शेजारच्या वाडग्यात कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या दाटीवाटीने डांबून ठेवलेली होती.
उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, पोलीस नाईक शरद तांबे यांनी केली. पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम तपास करीत आहेत.