वेणेखोल प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन म्हसवडला : शिवेंद्रसिंहराजे

By Admin | Updated: August 25, 2015 23:05 IST2015-08-25T23:05:01+5:302015-08-25T23:05:01+5:30

शासनाचा हिरवा कंदील : जिल्हाधिकारी कार्यालयास मिळाले पत्र

The rehabilitation of Vinekhole project affected people: Shivendra Singh Maharaj | वेणेखोल प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन म्हसवडला : शिवेंद्रसिंहराजे

वेणेखोल प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन म्हसवडला : शिवेंद्रसिंहराजे

सातारा : ‘उरमोडी धरण प्रकल्पातील वेणेखोल प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन म्हसवड, ता. माण येथे होणार होते. मात्र, प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे हा प्रश्न कित्येक वर्षे प्रलंबित होता. अखरे वेणेखोल प्रकल्पग्रस्तांचे म्हसवड येथे पुनर्वसन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे,’ अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.
यासंदर्भात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, उरमोडी धरण प्रकल्पातील वेणेखोल या गावातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन म्हसवड, ता. माण जि. सातारा येथे १३९.५५ हेक्टर क्षेत्रावर करण्याचा निर्णय झाला होता. यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्यासमवेत अनेकदा बैठका झाल्या; मात्र पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत नेहमीच उडवाउडवीची उत्तरे आणि टाळाटाळ केली जात होती. यामुळे हतबल झालेल्या वेणेखोल प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती.
पुनर्वसन म्हसवड येथे करण्याचे नियोजित असताना प्रशासनाने अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचा घाट घातला होता. यासंदर्भात पुनर्वसन मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर आले असताना वेणेखोल प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत त्यांना निवेदन देऊन हा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली होती. मंत्रालयातील महसूल व वनविभागाचे कक्ष अधिकारी प्र. रा. मुंढे यांनी वेणेखोल प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन म्हसवड येथे करण्यास शासनाने मान्यता दिल्याचे पत्र सातारा जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना दि. ७ आॅगस्ट २०१५ रोजी पाठवले आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांमुळे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन म्हसवड येथे करण्यास मान्यता दिल्याने वेणेखोल प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)

प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठाम
हा निर्णय झाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असून, पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपण प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी उभे राहू, असे आश्वासन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रकल्पग्रस्तांना दिले

Web Title: The rehabilitation of Vinekhole project affected people: Shivendra Singh Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.