सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमधील तीन गावांचे पुनर्वसन

By Admin | Updated: October 8, 2015 21:52 IST2015-10-08T21:52:03+5:302015-10-08T21:52:03+5:30

वन्यजीव विभागाची माहिती : मळे, कोळणे, पाथारपुंज यांचा समावेश

Rehabilitation of three villages in Core Zone in Sahyadri Tiger Reserve | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमधील तीन गावांचे पुनर्वसन

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमधील तीन गावांचे पुनर्वसन

कोयनानगर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये येणाऱ्या मळे, कोळणे, पाथारपुंज या तीन गावांच्या पुनर्वसनावर दहा वर्षांनंतर शिक्कामोर्तब झाला आहे. तिन्ही गावांचे पुनर्वसन पाटण तालुक्यातील सोनाईचीवाडी, बहुले जरेवाडी तर कोळणे या गावाचे पुनर्वसन किल्ले मच्छिंद्रगड व पाटण तालुक्यातील बोंद्री या ठिकाणी करण्यात येणार असल्याचे वन्यजीव विभागाने गुरुवारी स्पष्ट केले़ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासंदर्भात कोयना विभागातील जनतेच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी कोयनानगर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते़ यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या विभागीय अधिकारी मिलिंद पंडितराव वनाधिकारी सुभाष पुराणिक, शिवसेनचे जिल्हा उपप्रमुख जयवंत शेलार, तालुकाप्रमुख रवींद्र पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य हरीष भोमकर, अशोक पाटील, विभागप्रमुख किसनराव कदम, यदू यादव, माजी सरपंच शैलेंद्र शेलार, धोंडिराम भोमकर, शंकर महाजन, अंकुश देसाई, बबनराव कदम, संजय पवार, भागोजी शेळके आदी उपस्थित होते.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चराई बंदी, कुऱ्हाड बंदी नसावी, त्याचबरोबर शेतकऱ्यांना वीस अंश उतार वाट असणाऱ्या जमिनीमध्ये निर्बंध असू नये, त्याबरोबर बफर झोनमध्ये खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात येऊ नये, रात्री-अपरात्री येण्या-जाण्यावर, मिरवणुकीवर, वाद्यवृंदावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध असू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. (प्रतिनिधी)

कोयना विभागातील १४ गावांचा कोअर झोनमध्ये १८ आॅक्टोबर २०१० पासून करण्यात आला आहे़ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे या गावातील खरेदी-विक्री व्यवहारावर बंदी घालण्यात आले आहे. ही गावे कोअर झोनमधून वगळून त्यांचा समावेश ‘बफर झोन’मध्ये करण्यात यावा, असा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आघाडी शासनाने केला आहे़ ही १४ गावे कोअर झोनमधून अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वनाधिकारी मिलिंद पंडितराव यांनी सांगितले. आघाडी शासनाची जी भूमिका आहे तीच भूमिका तालुक्याचा लोकप्रतिनीधी म्हणून माजी व युती शासनाची आहे. वगळण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
-शंभूराज देसाई, आमदार

Web Title: Rehabilitation of three villages in Core Zone in Sahyadri Tiger Reserve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.