कोरोना तपासण्या वाढवून रुग्ण कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:47 IST2021-09-17T04:47:19+5:302021-09-17T04:47:19+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढवूनदेखील रुग्णसंख्या कमी आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळू लागला आहे. गुरुवारी ...

कोरोना तपासण्या वाढवून रुग्ण कमी
सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढवूनदेखील रुग्णसंख्या कमी आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळू लागला आहे. गुरुवारी ११ हजार ९५५ तपासण्यांमधून २५२ बाधित आढळून आले आहेत. तर एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही.
फलटण तालुक्यात सर्वाधिक ७२, तर त्याखालोखाल सातारा तालुक्यात ५४ रुग्ण आढळले आहेत. कऱ्हाड २२, खंडाळा ५, खटाव ३६, कोरेगाव ३०, माण १३, महाबळेश्वर ६, पाटण ६, फलटण ७२, सातारा ५४, वाई ५ व इतर ३ असे आज अखेर एकूण २ लाख ४५ हजार ४८२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या ६ हजार २२ वर स्थिर राहिली आहे. ६३० लोकांना गुरुवारी घरी सोडण्यात आले, तर ७ हजार ६०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.