सलग दुसऱ्या दिवशी एका मृत्यूची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:41 IST2021-09-03T04:41:55+5:302021-09-03T04:41:55+5:30
सातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित एकाच व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली. बाधितांच्या मृत्यूची संख्या घटल्याने दिलासा मिळाला आहे. ...

सलग दुसऱ्या दिवशी एका मृत्यूची नोंद
सातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित एकाच व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली. बाधितांच्या मृत्यूची संख्या घटल्याने दिलासा मिळाला आहे. तर ४७० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
जावळी, खंडाळा, वाई, महाबळेश्वर तालुके वगळता इतर सर्वच तालुक्यांमध्ये ५० च्यावर रुग्ण आढळून आले. जावळीत ३, कऱ्हाडात ५३, खंडाळ्यात १७, खटावात ४५, कोरेगांवात ५३, माणमध्ये ७७, महाबळेश्वरात २, पाटणमध्ये ६, फलटणमध्ये ९७, साताऱ्यात ८४, वाईत २३ व इतर १० असे आज अखेर एकूण २ लाख ४० हजार ५४७ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर खटाव तालुक्यात एका बाधिताच्या मृत्यूची नाेंद झाली. जिल्ह्यातील बाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या ६ हजार ५१ इतकी झाली आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या गुरुवारी संध्याकाळपर्यंत ७६३ जणांना घरी सोडण्यात आले. तर ९ हजार ९५६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.