शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर गुन्ह्याची नोंद, महिलेसह तिघे दोन वर्षे जिल्ह्यातून हद्दपार

By दत्ता यादव | Updated: February 20, 2024 22:16 IST

सातारा तालुक्यातील बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध गुन्हे दाखल असलेल्या तिघांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

दत्ता यादव, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : सातारा तालुक्यातील बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध गुन्हे दाखल असलेल्या तिघांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केली आहे.शकिला गुलाब मुलाणी (वय ६०), अमीर गुलाब मुलाणी (वय ३७), समीर गुलाब मुलाणी (वय ३३, रा. टिटवेवाडी, देशमुखनगर, ता. सातारा), अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरील संशयितांवर दुखापत करून शिवीगाळ, दमदाटी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, अवैध दारूची विक्री करणे, बेकायदेशीर जमाव जमवून गर्दी, हाणामारी यासह विविध गुन्हे त्यांच्यावर बोरगाव पोलिस ठाण्यात दाखल आहेत. या गुन्ह्यात त्यांना अनेकदा अटकही झाली. मात्र, जामिनावर बाहेर आल्यानंतर गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नाही. त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्याने त्यांचा लोकांना फार मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत होता. या टोळक्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून केली जात होती. या पार्श्वभूमीवर बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आर. जी. तेलतुंबडे यांनी या टोळीला हद्दपार करण्यासाठीचा प्रस्ताव पाेलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठविला होता. यावर सुनावणी झाल्यानंतर वरील तिघांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आंचल दलाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, केतन शिंदे, अनुराधा सणस, दादा स्वामी, प्रशांत चव्हाण, विशाल जाधव यांनी योग्य पुरावे सादर केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी