शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

Satara-ZP Election: 'मिनि'मंत्रालयाच्या निवडणुकीत विधानसभा मतदारसंघाची पुनर्बांधणी; जागा-वाटपाची रस्सीखेच सुरू

By दीपक देशमुख | Updated: January 14, 2026 18:31 IST

जिल्ह्यावर वर्चस्व राखण्यासाठी पक्ष सरसावले

दीपक देशमुखसातारा : विधानसभा निवडणूक एकजुटीने लढवणाऱ्या महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये नगरपालिका निवडणुकीवेळी खटका उडाला होता. त्यानंतर आता जिल्हा परिषदेवर वर्चस्व राखण्यासाठी भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात पुन्हा रस्सीखेच दिसणार आहे. या निवडणुकांमध्ये ग्राउंड लेव्हलवर ताकद आमजावल्यानंतर आगामी विधानसभेची समीकरणे ठरणार आहेत.गेल्या नऊ वर्षांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासकराज असले तरी वर्षभरापासून इच्छुकांकडून छुपी तयारी सुरूच होतीच. आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चार आमदार असणाऱ्या भाजपचा जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवण्याचा अजेंडा लपून राहिलेला नाही. नगरपालिका निवडणुकीतही भाजपाने याची चुणूक दाखवली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खेचून आणण्यासाठी जागावाटपात जास्त जागा मिळवणे आणि सर्वाधिक जागा जिंकणे, यावर भाजपचा भर राहणार आहे.आजअखेर झेडपीवर वर्चस्व ठेवणाऱ्या राष्ट्रवादीला बदललेल्या परिस्थितीचा अंदाज असला आहे. तरीही जेथे पक्षाची ताकद आहे, त्या जागांवर मजबूत दावा मांडण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदेसेनाही आपले गडावर वर्चस्व राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

वाचा : सातारा ‘झेडपी’च्या ६५ गट अन् पंचायत समितींच्या १३० गणांसाठी रणसंग्रामदुसरीकडे महाविकास आघाडीच्या पक्षांची अस्तित्त्वाची लढाई आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाची बोलणी फिस्कटतील, त्याठिकाणी महाविकास आघाडीच्या समविचारी पक्षाशी सोयरीक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषदेच्या निकालानंतर पक्षांच्या ताकदीबरोबरच कार्यकर्त्यांचीही ताकद समजणार आहे. त्यानुसार पुढील विधानसभेची रणनीती ठरवली जाऊ शकते.

विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच रणनीतीमतदारसंघ सुरक्षित राखण्यासाठी सर्वच आमदारांनी निवडणूक हातात घेतली असून, मेळावे, बैठका, इच्छुकांच्या मुलाखती या माध्यमातून तयारी सुरू आहे. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीला विरोधात काम करणारे तसेच मदत करणाऱ्यांचा लेखा-जोखा आमदारांनी जवळ ठेवला आहे. आगामी विधानसभेला कोण सोबत येईल, याचाही विचार जिल्हा परिषदेचे उमेदवार ठरवताना घेतला जात आहे. एकूणच पुढील विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच रणनीती आखली जात आहे.

जागा-वाटपाची रस्सीखेच सुरूजिल्ह्यात कराड उत्तर, कराड दक्षिण, माण-खटाव आणि सातारा याठिकाणी चार आमदार आहेत. भाजपचे वर्चस्व असलेल्या या मतदार संघांतच ३२ जिल्हा परिषद गट आहेत. याशिवाय फलटणचे आमदार राष्ट्रवादीचे असले तरी ते मुळचे भाजपतून तांत्रिक अडचणीमुळे राष्ट्रवादीत गेले आहेत. त्याठिकाणी शिंदेसेना आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीही ताकद असली तरी जागा-वाटपावेळी मोठ्या राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara ZP Election: Coalition parties vie for power, eyeing assembly seats.

Web Summary : Satara ZP elections see intense competition among BJP, Shinde Sena, and NCP. Parties aim to gain ground-level strength, influencing future assembly equations. Seat-sharing negotiations are underway, with an eye on upcoming assembly elections.