पारखे यांच्या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट

By Admin | Updated: February 21, 2015 23:46 IST2015-02-21T23:24:18+5:302015-02-21T23:46:24+5:30

कठापूर येथे शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार

The reason behind Parchekar's suicide is unclear | पारखे यांच्या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट

पारखे यांच्या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट

कोरेगाव : विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केलेल्या निवृत्त मुख्य वनसंरक्षक भारत पारखे यांच्यावर कठापूर येथे शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे नातेवाईक, वन विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच गोगावलेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, आत्महत्येमागील कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही.
ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर पारखे यांच्या मुलाने मृतदेह ताब्यात घेतला. गोगावलेवाडी येथील फार्म हाउस येथे मृतदेह नेण्यात आला. त्यानंतर कठापूर येथे नदीतीरी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी पारखे कुटुंबातील सदस्यांना पोलीस ठाण्यात बोलावले होते; मात्र ते आले नाहीत. ते आल्यानंतर नेमकी घटना व पार्श्वभूमी स्पष्ट होईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The reason behind Parchekar's suicide is unclear