शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
2
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
4
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
5
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
6
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
7
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
8
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
9
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
10
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
11
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
12
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
13
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
14
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
15
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
16
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
17
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
18
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
19
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
20
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध

स्वेच्छानिवृत्ती घेऊन रत्नागिरीचा पोलिस बनला तस्कर, व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचा कट 

By दत्ता यादव | Updated: May 10, 2023 21:42 IST

झटपट श्रीमंतीचा हव्यास; पेशंट आणायचाय म्हणून रुग्णवाहिका बुक

सातारा : रत्नागिरी पोलिस दलाच्या एलसीबीसारख्या शाखेत काम केलेल्या निष्णात पोलिस कर्मचाऱ्याने स्वेच्छानिवृत्ती घेऊन तस्कर बननं पसंत केलं. जेव्हा हे समोर आलं तेव्हा सातारचं पोलिस दलही अवाक झालं. झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचा कट चाैघांनी जवळपास तडीसच नेला होता; पण सातारच्या एलसीबीने कायदा राबविण्याचा अनुभव असलेल्या पोलिसाचा कट अखेर धुळीस मिळविला.

किरण भाटकर (वय ५०, रा. भाटीये, ता. जि. रत्नागिरी) हा रत्नागिरी पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होता. काही वर्षांपूर्वी त्यानं म्हणे, पोलिस दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. मात्र, पोलिस दलात काम करताना व्हेल माशाच्या उलटीची किंमत काय आहे, हे तो जाणून होता. रत्नागिरीतील सिद्धार्थ लाकडे याच्या ओळखीने हातकणंगलेतील मुंबईस्थित राहणारा अनिस शेख हा व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीमध्ये काम करत असल्याचे त्यांना समजलं. त्यानुसार रत्नागिरीतून व्हेल माशाची उलटी या चाैघांनी घेतली.

त्याची डील मुंबईतील एका धनाड्य व्यक्तीसोबत ठरली; पण तिथपर्यंत उलटी पोहोचवायची कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पण कायदा राबविलेल्या पोलिसाचा अनुभव आणि तस्करी क्षेत्रात पाय घट्ट रोवून डील करणाऱ्या अनिस शेख याच्या डोक्यातून भन्नाट कल्पना समोर आली. जर रुग्णवाहिकेतून आपण मुंबईपर्यंत पोहोचलो तर आपले काम फत्ते झाले, असे समजा.

त्यामुळे त्यांनी रत्नागिरीतीलच रुग्णवाहिका चालक नासिर राऊत याला कऱ्हाडला पेशंट आणायचा आहे, असे सांगून रुग्णवाहका बुक केली. तिघेही रुग्णवाहिकेत बसले. कऱ्हाडपर्यंत आल्यानंतर चालकाने त्यांना आता कुठे जायचे आहे, असे विचारले असता चला सांगतो, तुम्हाला भाडे दिले म्हणजे बास ना, असे म्हणून त्याला पुण्याच्या दिशेने रुग्णवाहिका नेण्यास सांगितले. मात्र, साताऱ्याजवळ आल्यानंतर सातारा एलसीबीने त्यांची रुग्णवाहिका अडविली. तेव्हा निवृत्त पोलिसासह रुग्णवाहिका चालकाचीही पाचावर धारण बसली. जेव्हा पोलिसांनी व्हेल माशाची उलटी जप्त केली तेव्हाच रुग्णवाहिका चालकाला समजलं, पेशंट आणायचा नाही तर व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीत आपण अडकलोय. त्यांन खरं खरं सारं पोलिसांना सांगून टाकलं.

तर डील यशस्वी झाली असती...

सहसा रुग्णवाहिका कधीही अडवली जात नाही. त्यामुळे या तस्करांनी रुग्णवाहिका निवडली; पण सातारच्या एलसीबीचे स्ट्राॅंग नेटवर्क त्यांचे कट उद्ध्वस्त करण्यात कारणीभूत ठरले. अन्यथा पाच कोटींची डील त्यांची यशस्वी झाली असती.

टॅग्स :Policeपोलिसsatara-acसाताराCrime Newsगुन्हेगारी