सखींसाठी आजपासून रास-दांडिया महोत्सव

By Admin | Updated: September 28, 2014 00:33 IST2014-09-28T00:31:36+5:302014-09-28T00:33:35+5:30

लकी ड्रॉ मधून दररोज दहा बक्षिसे जिंकण्याची संधी

Ras-Dandiya Festival for Sakshi | सखींसाठी आजपासून रास-दांडिया महोत्सव

सखींसाठी आजपासून रास-दांडिया महोत्सव

सातारा : जिजाऊ प्रतिष्ठान आणि लोकमत सखी मंच’ यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यातील सखी मंच सदस्य, इतर महिला आणि महाविद्यालयीन युवतींसाठी रविवार, दि. २८ सप्टेंबरपासून ते १ आॅक्टोबरपर्यंत सायंकाळी साडेसहा ते साडेदहा या वेळेत अनंत इंग्लिश स्कूलमध्ये ‘रास-दांडिया २०१४’ या ‘रंगारंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
साताऱ्यातील महिला व युवती कला, क्रीडा व उद्योग क्षेत्रात भरारी घेत आहेत. नवरात्रौत्सवात दांडिया कलेला व्यापक स्वरूप मिळावे, या उद्देश्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चार दिवस चालणाऱ्या दांडिया उत्सवात दररोज वेशभूषा, इनोवेटिव्ह स्टेप्स, नृत्य अशी विविध बक्षिसे देण्यात येणार आहे.
स्पर्धेत दररोज दहा पारितोषिके जिंकण्याची संधी सखींना मिळणार आहे. स्पर्धेच्या समारोपादिवशी ‘रास दांडिया क्विन’ला ३२ इंची एलईडी टीवी, दुसऱ्या क्रमांकाला अ‍ॅटोमेटिक आटाचक्की, तिसऱ्या क्रमांकासाठी रेफ्रिजरेटर तर चौथ्या क्रमांकासाठी सेमी आॅटो वॉशिंग मशीन अशी एकूण दोन लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेत सलग तीन दिवस सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचाच शेवटच्या दिवशी देण्यात येणाऱ्या मेगा बक्षिसांसाठी विचार केला जाईल. यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक असून, ५० रुपये शुल्क भरून स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. कार्यक्रम पाहण्यासाठी सर्व महिलांना मोफत प्रवेश दिला जाईल.
स्पर्धेत तसेच दांडिया खेळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सखी मंच सदस्य इतर महिला आणि महाविद्यालयीन युवती सहभागी होऊ शकतात. कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या महिलांनाही दररोज लकी ड्रॉ मधून बक्षिसे जिंकता येतील. यासाठी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होणारे कूपन आवश्यक आहे. आज पहिले कूपन प्रसिद्ध करण्यात आले असून, हेच कूपन लकी ड्रॉ करिता ग्राह्य धरले जाईल.
आजपासून दररोज एक अशी चार कूपन प्रसिद्ध करण्यात येतील. महोत्सवाचे उद्घाटन चेतना माजगावकर, शिवाजी खुडे, गीता मामणिया, टिना शहा, ज्योती ठक्कर, मनोज देशमुख, माधव सुर्वे यांच्या उपस्थितीत होणार आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: Ras-Dandiya Festival for Sakshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.