शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुर्मीळ काळ्या रानकुत्र्याची नोंद, जवळपास ८८ वर्षांनी अशा प्राण्याचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 15:48 IST

या घटनेने जैवविविधतेच्या दृष्टीने मोठे महत्त्व प्राप्त झाले

कऱ्हाड (जि. सातारा) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील जंगलात अत्यंत दुर्मीळ अशा काळ्या रानकुत्र्याची (मेलेनिस्टिक) नोंद झाली असून, या घटनेने जैवविविधतेच्या दृष्टीने मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. कऱ्हाड येथील पर्यटक दिग्विजय पाटील हे सफारीसाठी गेले असता त्यांना पूर्णतः काळ्या रंगाचा रानकुत्रा दिसून आला. त्यांनी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना माहिती दिली.वनविभागाच्या अभिलेखानुसार, यापूर्वी १९३६ मध्ये तामिळनाडूमधील कोईम्बतूर येथे स्कॉट्समॅन आणि निसर्गशास्त्रज्ञ आर. सी. मॉरिस यांनी अशाच प्रकारच्या काळ्या रानकुत्र्याची नोंद केली होती. जवळपास ८८ वर्षांनी अशा दुर्मीळ प्राण्याचे दर्शन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात झाले आहे.रानकुत्रा किंवा कोळशिंदा सामान्यतः तांबूस लालसर रंगाचा असतो. मात्र, मेलेनिस्टिक या जैविक स्थितीमुळे त्याच्या शरीरात मेलेनिन या रंगद्रव्याचे असामान्य प्रमाण निर्माण होते, ज्यामुळे तो पूर्णतः काळा दिसतो. ही स्थिती सस्तन प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांच्यात आढळते आणि ती आनुवंशिक स्वरूपाची असते.

मेलेनिस्टिक म्हणजे शरीरात मेलेनिनचे प्रमाण जास्त असल्याने प्राणी काळसर दिसतो. यापूर्वी सह्याद्रीत काळा बिबट्याही नोंदवला गेला होता. आता काळा रानकुत्राही आढळल्याने प्रकल्पातील जैवविविधतेचे दुर्मीळ रूप समोर आले. - रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक.