कराड : येरवळे (ता. कराड) येथे दुर्मीळ अलबिनो ‘तस्कर' सापसापडला. सर्पमित्र विशाल खंडागळे, विनोद पानस्कर, सागर बिंद्रा व अनिकेत यादव यांनी या ‘तस्कर'' जातीच्या सापाचे यशस्वी रेस्क्यू करून त्याला जीवदान दिले.सचिन लक्ष्मण मोहिते यांना हा अनोखा साप दिसून आला. त्यांनी स्थानिक सर्पमित्रांना संपर्क केला. प्राणिमित्र रोहित रत्नाकर कुलकर्णी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही सापाची काळजीपूर्वक पाहणी करून हा अलबिनो तस्कर आहे असे सांगितले. यानंतर डब्लूआरके एनजीओचे गणेश काळे आणि योगेश शिंगण देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सापाचा अभ्यास केल्यानंतर तो कराड तालुक्यात आढळणाऱ्या पहिल्या आणि सातारा जिल्ह्यातील तिसऱ्या अलबिनो तस्कर साप असल्याचे नमूद केले.निरुपद्रवी अन् बिनविषारी वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा साप सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला. तस्कर साप हा भारतात आढळणारा निरुपद्रवी बिनविषारी सर्प असून सहसा करडा-तपकिरी रंगाचा असतो. रेस्क्यू झालेला साप अलबिनो असल्यामुळे पिवळसर रंगाचा होता. त्याची लांबी सुमारे चार फूट होती आणि त्याचे खाद्य सरडे, पाली, उंदीर यांचा समाविष्ट आहे. निसर्गाने सापांच्या शरीरावर केलेली रंगांची अद्भूत उधळण त्यांना शिकार करण्यात व बचाव करण्यात मदत करते.
Web Summary : A rare albino trinket snake was rescued in Yeravale, Satara. The non-venomous snake, about four feet long, was safely released into its natural habitat after being examined by experts. It is the third such snake found in Satara.
Web Summary : सतारा के येरावले में एक दुर्लभ एल्बिनो ट्रिंकेट सांप को बचाया गया। गैर विषैला, लगभग चार फीट लंबा सांप, विशेषज्ञों द्वारा जांच के बाद सुरक्षित रूप से उसके प्राकृतिक आवास में छोड़ दिया गया। सतारा में पाया जाने वाला यह तीसरा सांप है।