सातारा : इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या १७ वर्षीय तरुणीवर एका तरुणाने विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात संबंधित तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.विशाल बाळकृष्ण अवघडे (वय ३५, रा. कुमठे, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी १७ वर्षांची असून, विशाल आणि तिची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. या ओळखीतून विशालने पीडितेला त्याच्या दुचाकीवर बसवून साताऱ्यातील विविध ठिकाणी फिरवले. तसेच पाटखळ येथील एका लाॅजवर गोड बोलून नेऊन तिच्यावर त्याने बलात्कार केला. हा प्रकार २६ ऑक्टोबर २०२३ रोजी घडला. मात्र, घाबरलेल्या पीडित तरुणीने या घटनेची कोठेही वाच्यता केली नाही. ती घरात शांत राहत असल्याने आईने तिची विचारपूस केली असता घडलेला प्रकार तिने आईला सांगितला. त्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात पीडित तरुणीने तक्रार दाखल केली. संशयित आरोपी विशाल अवघडे याला अद्यापपर्यंत अटक झाली नव्हती. सहायक पोलिस निरीक्षक पालवे हे अधिक तपास करीत आहेत.
Satara: इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून तरुणीवर अत्याचार, संबंधित तरुणावर बलात्काराचा गुन्हा
By दत्ता यादव | Updated: November 2, 2023 14:08 IST