शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टचा बहाणा करून मैत्रिणीच्या पतीकडून बलात्कार, तरुणास अटक; साताऱ्यातील घटना

By दत्ता यादव | Updated: March 4, 2023 16:21 IST

आपलीच इज्जत जाईल या भीतीने तिने महिनाभर हा प्रकार कोणालाच सांगितला नाही

सातारा : लिफ्टचा बहाणा करून  दुचाकीवरून नदीकाठी शेतात नेऊन जबरदस्तीने तरुणीवर तिच्या मैत्रिणीच्या पतीने बलात्कार केला. ही धक्कादायक घटना साताऱ्यात घडली असून, याप्रकरणी एका तरुणाला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी साताऱ्यातील राहणारी असून, ती १९ वर्षांची आहे. तिच्या कुटुंबीयांनी दुसरीकडे भाड्याने खोली घेतली होती. १२ फेब्रुवारी रोजी शिफ्टिंग सुरू होतं. तेव्हा रात्री पावणेबारा वाजता ती तरुणी भाड्याने घेतलेल्या नव्या घरी जाण्यासाठी निघाली. त्यावेळी तिच्या मैत्रिणीच्या पतीने ‘तुला लिफ्ट देतो, घरी सोडतो,’ असे पीडित तरुणीला सांगितले. त्यामुळे तरुणी त्याच्यासोबत दुचाकीवरून घरी जाण्यास तयार झाली.

त्या तरूणाने पीडित तरुणीला दुचाकीवर बसवून दुचाकी घरी नेण्याऐवजी वर्ये, ता. सातारा गावाजवळ असलेल्या वेण्णा नदीकडे जबरदस्तीने नेली. त्यावेळी रात्रीचे बारा वाजले होते. नदीकाठी असलेल्या एका शेतात नेऊन पीडित तरुणीवर त्याने बलात्कार केला. ‘तुझे वडील हाॅस्पिटलमध्ये अॅडमीट आहेत, हे लक्षात ठेव. कोणाला सांगितलेस तर माझ्याशी गाठ आहे,’ अशी पीडित तरुणीला त्याने धमकी दिली. त्यानंतर रात्री दीड वाजता पीडित तरुणीला त्याने तिच्या घराजवळ आणून सोडले. या प्रकारानंतर पीडित तरुणी भयभीत झाली होती. आपण हा प्रकार जर कोणाला सांगितला तर आपलीच इज्जत जाईल, या भीतीने तिने महिनाभर हा प्रकार कोणालाच सांगितला नाही.

परंतु तिच्यावर झालेल्या या अन्यायाने तिला स्वस्त बसू दिले नाही. शुक्रवार, दि. ३ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता तिने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. नराधम आरोपी हा पीडितेच्या मैत्रिणीचा पती आहे. पोलिसांनी तातडीने दखल घेऊन संबंधित नराधम तरुणाला अटक केली आहे.विश्वास कोणावर ठेवायचा...दोघे एकाच पेठेत राहत असल्यामुळे तसेच मैत्रिणीचा पती असल्यामुळे पीडित तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला. आपल्याला तो घरी सुखरूप सोडेल, असे तिला वाटले; पण गाडीचा वेग वाढवून गाडी त्याने भलतीकडेच नेली आणि ज्याची भीती पीडितेला होती, तेच झालं. आपल्या ओळखीतलेच अब्रूची लक्तरे काढत असतील तर विश्वास कोणावर ठेवायचा, असा संतप्त सवाल सातारकरांमधून विचारला जातोय.   

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस