रणजित भोसलेंच्या पोलीस कोठडीत वाढ
By Admin | Updated: June 5, 2014 00:06 IST2014-06-05T00:06:20+5:302014-06-05T00:06:59+5:30
पैशाच्या देवाण-घेवाणीवरून अपहरण

रणजित भोसलेंच्या पोलीस कोठडीत वाढ
सातारा : करंजे पेठेतील अनिल कस्तुरे यांचे पैशाच्या देवाण-घेवाणीवरून अपहरण केल्याचा आरोप असणारे ‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांच्या पोलीस कोठडीत दि. ६ पर्यंत वाढ झाली आहे. दरम्यान, याप्रकरणात रणजित भोसले यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर भोसले यांना अटक झाली. भोसले यांना प्रथम न्यायालयात हजर केल्यावर दि. ४ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर भोसलेंना बुधवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दि. ६ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर अन्य दोघांच्याही पोलीस कोठडीत वाढ झाली आहे, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)