राणेंनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावा : शशिकांत शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:37 IST2021-08-29T04:37:55+5:302021-08-29T04:37:55+5:30
सातारा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या पदाचा उपयोग हा महाराष्ट्रासाठी प्रगतीसाठी करावा, त्यांचा उपयोग केवळ राजकारणासाठी होऊ ...

राणेंनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावा : शशिकांत शिंदे
सातारा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या पदाचा उपयोग हा महाराष्ट्रासाठी प्रगतीसाठी करावा, त्यांचा उपयोग केवळ राजकारणासाठी होऊ नये, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
आ. शिंदे म्हणाले, महाराष्ट्र हा सुसंस्कृत आणि पुरोगामी विचारांचा आहे. प्रत्येक नेता गांभीर्याने घेत असतो. नारायण राणे हे महाराष्ट्राचे नेते आहे. माजी मुख्यमंत्री आहेत, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री आहेत. यांनी मिळालेल्या संधीचा उपयोग महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी करावा, राजकारणासाठी होऊ नये. अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. शाब्दिक वाद होत असतात, ते वैयक्तिक पातळीवर होऊ नयेत. वैयक्तिक वाद होऊ नयेत, अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे.
आगामी नगरपालिका निवडणुकीबाबत छेडले असता आमदार शिंदे म्हणाले, आगामी नगरपालिका निवडणूक वॉर्डनिहाय की प्रभागनिहाय घ्यायची, याबाबत चर्चा आहे. तिसऱ्या लाटेमुळे साशंकता आहे. ऑक्टोबर महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाहीत. जेव्हा निवडणुका होतील त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षमतेने निवडणुकीला सामोरे जाईल.
आमदार शशिकांत शिंदे यांचा आयकार्ड फोटो वापरावा