मलकापूर : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी खुल्या प्रवर्गातून कल्पना रैनाक यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र तेली यांच्याकडे दाखल केला. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीमध्ये केवळ एकच अर्ज आल्याने कल्पना रैनाक यांची नगराध्यपदी निवड निश्चित झाली आहे. याबाबतची औपचारिक घोषणा मंगळवारी (दि. २२) होणार आहे. मलकापूर नगरपंचायतीची सप्टेंबर २०१३ रोजी सार्वत्रिक निवडणूक होऊन पहिल्या वर्षासाठी अनुसूचित जातीच्या महिलेसाठी नगराध्यक्षपद राखीव होते. त्यानुसार सुनंदा साठे यांची नगराध्यपदी निवड करण्यात आली. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे निवड प्रक्रियेनुसार गुरुवारी अर्ज भरण्याच्या मुदतीत श्रीलक्ष्मी डोंगराई देवी नगरविकास आघाडीच्या वतीने कल्पना रैनाक यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. यावेळी करण्यात आलेल्या अर्ज छाननीत रैनाक यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. त्यामुळे कल्पना रैनाक यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यावेळी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, शंकरराव चांदे, आर. टी. स्वामी, सुनंदा साठे, राजेंद्र यादव, मनीषा लाखे, सुनीता पोळ, नूरजहॉ मुल्ला, नयना वेळापुरे, ज्ञानदेव साळुंखे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)त्याच दिवशी उपनगराध्यक्ष निवडमंगळवारी (दि. २२) अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीनंतर नगराध्यक्ष निवड होत आहे. नगराध्यक्ष निवडीनंतर त्याच ठिकाणी उपनगराध्यक्ष निवड होत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र तेली यांनी दिली.भोसले समर्थक गैरहजरयेथील नगरपंचायतीमध्ये १७ नगरसेवकांची संख्या आहे. सर्व नगरसेवक काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले आहेत. गुरुवारी नगराध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान भोसले समर्थक सहा नगरसेवक अनुपस्थित होते.
मलकापूरच्या नगराध्यक्षपदी रैनाक निश्चित
By admin | Updated: March 18, 2016 23:55 IST