भाग गेला... शीण गेला; अवघा झाला आनंद!
By Admin | Updated: July 20, 2015 00:05 IST2015-07-19T21:58:23+5:302015-07-20T00:05:53+5:30
पंढरीच्या वाटेवर : लेकुरवाळ्या विठोबाचे दर्शन आले समीप

भाग गेला... शीण गेला; अवघा झाला आनंद!
जगदीश कोष्टी ल्ल सातारा
आनंदाचे डोही, आनंद तरंग
आनंदाचे अंग, आनंदाने...
पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरी, कंबरेवर हात ठेवून विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून संतांच्या दिंड्या मार्गक्रमण करत आहेत. यामध्ये सहभागी झालेले लाखो वारकरी हे विठोबाचीच लेकरे आहेत. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत असताना वय विसरून फुगडी खेळणे, वडाच्या पारंब्यांना लटकण्याचा खेळ ते खेळत आहेत.
सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरला निघाली आहे. या दिंडीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून लहान-मोठ्या दिंड्या सहभागी होत आहेत. दिंडीत सहभागी होणारे नव्वद टक्के वारकरी हे शेतकरी, शेतमजूर कष्टकरी आहेत. यंदा राज्यभर पावसाने पाठ फिरविली असल्याने शेतातही फारशी कामे नसल्याने ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
माउलींचा हा पालखी सोहळा १२० किलोमीटरचा प्रवास करून फलटणनगरीत दाखल झाला असून, आणखी ११० किलोमीटरचा प्रवास करायचा आहे.
दररोज सरासरी वीस किलोमीटरचा पायी प्रवास करत असताना मुखात ‘विठू’ नामाचा जयघोष असल्याने कसलाही कंटाळा जाणवत नाही. ‘भाग गेला... शीण गेला अवघा झाला आनंद,’ अशीच अवस्था त्यांच्या मनाची झालेली असते. त्यामुळे कितीही प्रवास केला तरी ते आनंदी असतात.
पाऊस नाही, पाणी नाही, दुष्काळाचे सावट आहे. घरी कुटुंब आहे. या असलेल्या चिंता घरात ठेवून वारीत दाखल झालेले वारकरी वय, जात, धर्म, लिंग विसरून आनंद साजरा करत आहेत. फुगडी, सुरपारंब्या, झोका खेळण्यात मग्न असतात. वारीच्या मार्गावरही फलटण तालुक्यात हेच चित्र पाहायला मिळत आहे.

वारीमध्ये सहभागी झालेले वारकरी वय, लिंग, वर्ण, जात, धर्म विसरून विविध खेळ खळत असतात. हा खेळ पाहत असतानाच काहीना आनंद वाटत असतो. यामध्ये मानवी मनोरे करून त्यावर मृदंग वाजवणे, संगीत खुर्ची, महिला फेर धरून झिम्मा फुगडी आदी खेळ खेळत असतात. त्याचप्रमाणे भारुडामध्ये चालू घडामोडीवरही बोट ठेवले जात असल्याने भारुड ऐकण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ गर्दी करत असतात.
माउलींची पालखी आज बरड मुक्कामी
४वाठार निंबाळकर : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या मुक्कामासाठी बरड, ता. फलटण ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. माउलींची पालखी सोमवारी (दि. २०) रोजी बरड मुक्कामी आहे. यानिमित्त पालखी तळाजवळील तसेच जिथे दिंड्या व वारकरी मुक्काम करतात अशा जागांची स्वच्छता करुन औषध फवारणी करुन पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
४पंचायत समितीच्या वतीने पाणी टँकर, टँकर भरण्याचे फिडर, पालखी तळ व परिसरात फिरती औषध, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, स्वच्छतागृह, मोबाईल टॉयलेट आदींची सुविधा करण्यात आली आहे.
४तसेच महसूल विभागाच्या वतीने पालखी मुक्काम ठिकाणी पुरेसा रॉकेल साठा, धान्य, गॅस टाक्या आदींची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
४फलटण तालुक्यातील तिसरा व सातारा जिल्ह्यातील पाचवा मुक्काम असून, सातारा जिल्ह्यातील व फलटण तालुक्यातील अखेरचा मुक्काम आहे.
४बरड गावचा मुक्काम आटपून पालखी सोहळा मंगळवारी (दि. २१) सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल.
तरुणांनी केला माउलींचा मार्ग सुकर
आदर्की : संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात स्वागत होताच सातारा-लोणंद व वाठारस्टेशन-फलटण मार्ग वाहतुकीसाठी बंद केल्याने हिंगणगाव मार्गे वाहतूक सुरू होते; परंतु या मार्गावर मार्गदर्शक फलक नसल्याने वाहनधारक, भाविकांची फसगत होते. ही फसगत टाळण्यासाठी हिंगणगाव येथील तरुणांनी मुख्य चौकात मार्गदर्शक फलक लावल्याने भाविकांचा मार्ग सुकर झाला आहे.
हिंगणगाव येथून आदर्की-हिंगणगाव-लोणंद-आदर्की, हिंगणगाव-सासवड-मरडगाव, आदर्की-हिंगणगाव-सालपे-लोणंद, आदर्की-हिंगणगाव-कापशी असे चार मार्ग जातात. मात्र, मार्गदर्शक फलक नसल्याने वाहने मार्ग चुकतात. यावर उपाय म्हणून यावर्षी हिंगणगाव येथील तरुणांनी आझाद चौक येथे पालखी सोहळ्याकडे व गावांच्या नावाचे फलक लावल्याने भाविकांचा मार्ग सुकर झाला आहे. (वार्ताहर)