शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'तुतारी' हाती घेण्याची चर्चां; रामराजे नाईक-निंबाळकरांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

By दीपक शिंदे | Updated: October 5, 2024 19:37 IST

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी फलटणची उमेदवारी थेट जाहीर केली. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात फोनवरून जाहीर झालेल्या या ...

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी फलटणची उमेदवारी थेट जाहीर केली. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात फोनवरून जाहीर झालेल्या या उमेदवारीवर अजित पवार राष्ट्रवादीचे बडे नेते रामराजे नाईक - निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटातून बाहेर पडत ते तुतारी हातात घेण्याची शक्यता आहे.फलटण तालुक्यावर वर्चस्व असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी आत्तापर्यंत जो ठरविला तोच उमेदवार विजयी झालेला आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे आणि त्यानुसार उमेदवार देऊन त्याला निवडून आणण्याची पद्धत त्यांनी अवलंबिलेली आहे. असे असताना यावेळी अजित पवार यांनी सोळशी, ता. कोरेगाव याठिकाणी झालेल्या मेळाव्यात एका कार्यकर्त्याच्या मोबाइलवर फोन करत आमदार दीपक चव्हाण हेच फलटणचे उमेदवार असतील, असे जाहीर केले. या प्रकारामुळे रामराजे नाईक निंबाळकर हे दुखावले आहेत.कोणत्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतल्याशिवाय असे करणे हे त्यांना अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांचे मत आहे. निर्णय प्रक्रियेत आपल्याला डावलले जात असल्याचे यावरून स्पष्ट दिसत असल्याने त्यांनी अजित पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून राष्ट्रवादी अजित पवार गटात रहायचे की तुतारी हातात घ्यायची याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वीच रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवार हे आपले दैवत आहेत असे म्हटले होते. त्यानंतरच बहुतेक त्यांची वाटचाल तुतारीकडे होत असल्याचे जाणवत होते.

स्थानिक नेत्यांना विचारात घेऊन उमेदवार ठरविला गेला पाहिजे. फलटणच्या उमेदवारीबाबत असे झालेले नाही. एखाद्या वरिष्ठ नेत्याने उमेदवार ठरविला असला तरी स्थानिक कार्यकर्ते मतदान करत असतात. त्यामुळे त्यांना विश्वासात घेणे आवश्यक असते. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुढे काय निर्णय घ्यायचा हे ठरविणार आहोत. - रामराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती, विधानपरिषद

टॅग्स :Satara areaसातारा परिसरphaltan-acफलटणRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार