शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: फलटणमध्ये रामराजे अन् रणजितसिंह एका व्यासपीठावर; रामराजे म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 19:49 IST

आमचे मतभेद आहेत म्हणून आम्ही..

फलटण : ‘पत्रकारांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. रणजितसिंह व आमचे मतभेद आहेत. संघर्ष आहे, तुम्ही त्याला भांडण म्हणता. आमचे मतभेद आहेत म्हणून आम्ही एकमेकांची कॉलर पकडावी का? रणजितसिंह व मला आमच्या मर्यादा माहिती आहेत. आम्ही कुठं थांबायचं हे त्यांनाही व मलाही चांगले माहिती आहे. त्याची काळजी कुणी करू नये, मतभेद आणि भांडण यात फरक आहे. मतभेद असल्याशिवाय लोकशाही जिवंत राहत नाही, संघर्षाला सात्त्विकतेची आणि माणुसकीची जोड मिळावी, संघर्षाचा केंद्रबिंदू मिळणारी पदे नसावीत’, असे मत विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता यांच्या अमृतमहोत्सवी सत्काराप्रसंगी ते बोलत होते. रामराजे नाईक-निंबाळकर व माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातील वैर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. कोणतीही राजकीय सभा असो किंवा गावातील छोटा कार्यक्रम एकमेकांवर आरोप व टीका केल्याशिवाय कोणतीही सभा पूर्ण होत नाही. मात्र, बुधवारी फलटण येथे  सत्कार समारंभानिमित्त थोडं वेगळं चित्र नागरिकांना पहायला मिळालं.फलटणने  दोन्ही नाईक-निंबाळकर एकाच व्यासपीठावर हजर असल्याने फलटणकरांनी मात्र भुवया उंचावल्या होत्या. पण दोघांनीही एकमेकांवर टीका करण्याचे टाळल्याचे उपस्थितीतांनी आश्चर्य व्यक्त केले. मी अध्यक्ष पदाचा वापर केला नाही..पत्रकार अरविंद मेहता यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचे अध्यक्ष रामराजे होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना ते म्हणाले, कार्यक्रमाचा अध्यक्ष मी होतो. समाजशास्त्रात अध्यक्ष ठरवतो, कोणाला बोलायला द्यायचे आणि कोणाला नाही. आज मात्र मी त्याचा वापर केला नाही, असे रामराजे मिश्कीलपणे म्हणाले.