अधिकाऱ्यांच्या अंगावर धावले संतप्त नागरिक !
By Admin | Updated: May 21, 2015 00:04 IST2015-05-20T23:25:42+5:302015-05-21T00:04:46+5:30
करंजेत ‘रास्ता रोको’ : भरउन्हाळ्यात पाणी नसल्याने संतापाचा उद्रेक; प्राधिकरणच्या अधिकाऱ्याचा काढता पाय

अधिकाऱ्यांच्या अंगावर धावले संतप्त नागरिक !
सातारा : भरउन्हाळ्यात शनिवारपासून करंजे पेठेतील निम्म्या भागाला पाणी नसल्यामुळे तेथील नागरिक संतप्त झाले. करंजेत येणारे सर्व रस्ते रोखून धरतानाच त्यांनी सातारा-पुणे मार्गावरील वाहतूकही बुधवारी सकाळी काही काळ अडविली.
जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता विजय मेंगे यांनी या भागास भेट दिली असता त्यांच्या अंगावर नागरिक धावून गेले. अखेर पोलीस संरक्षणात मेंगे यांना काढता पाय घ्यावा लागला.
सकाळी नऊपासूनच संतप्त करंजेकर रस्त्यावर जमले होते. कळशा, बादल्या, हंड्यांबरोबरच दुचाकी वाहने आडवी लावून त्यांनी परिसरातील पाच रस्ते रोखून धरले. सातारा-पुणे मार्गावरही ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.
दुतर्फा वाहनांची मोठी रांग लागल्यावर पोलीस घटनास्थळी आले. ‘पुणे-सातारा रस्ता अडविल्यास गुन्हा दाखल करावा लागेल,’ अशी समज दिल्यानंतर नागरिकांनी केवळ अंतर्गत रस्ते सुमारे दीड तास अडवून धरले. आंदोलनाला अटकाव करणाऱ्या पोलिसांबरोबरही
पालिकेविषयी संताप
आंदोलनस्थळी पोलीस तैनात करण्यात आले; मात्र पालिकेतर्फे कोणीच फिरकले नाही, हे पाहून नागरिकांचा पारा चढला. अद्याप पाणीपट्टी पालिकेतच जमा करावी लागत असल्याने आणि प्रभागातील चारही नगरसेवकांनी आंदोलनाकडे पाठ फिरविल्याने पोलिसांचे न ऐकता नागरिक थेट अंत्यसंस्काराच्या गाडीत बसले आणि पालिकेच्या दिशेने मोर्चा वळविला.