रमाई आवास घरकुलांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

By Admin | Updated: June 10, 2017 13:51 IST2017-06-10T13:51:22+5:302017-06-10T13:51:22+5:30

भीमनगर येथे थेट लाभार्थ्यांशी संवाद

Ramai Housing Homestead surveyed by the Collector | रमाई आवास घरकुलांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

रमाई आवास घरकुलांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

आॅनलाईन लोकमत

सातारा, दि. १0 : कोरेगाव तालुक्यातील भीमनगर येथे थेट लाभार्थ्यांशी संवाद साधून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी रमाई आवास योजनेतील घरकुलांची पाहणी केली.

जिल्हाधिकारी सिंघल यांच्या उपस्थितीत कोरेगाव तालुक्यातील दरे येथे चावडीवाचन करण्यात आले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर येथील बालवाडी, अंगणवाडी यांचीही पाहणी त्यांनी केली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जवळच असणाऱ्या भीमनगर येथे भेट दिली.

येथील रमाई आवास योजनेतून बांधण्यात आलेल्या घरकुलांची त्यांनी पाहणी केली. लाभार्थी पंकज पांडूरंग कांबळे, सुनील हरिबा ससाणे यांच्याशी त्यांनी संवाद साधला. या योजनेसाठी किती पैसे मिळाले. काही अडचणी आल्या का, शौचालय बांधले आहे का आदींबाबत माहिती घेवून बांधलेल्या शौचालयांचा वापर करा, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी प्रांतांधिकारी हिम्मत खराडे, तहसिलदार स्मिता पवार, नायब तहसिलदार रवींद्र रांजणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Ramai Housing Homestead surveyed by the Collector