शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Rajya Sabha Election: सातारा जिल्ह्यातील आघाडीच्या आमदारांनी गाठली मुंबई, दोन्हींकडे हात ठेवणाऱ्यांची गोची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 17:18 IST

अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांवर निवडणुकीचे गणित अधिक पटीने अवलंबून राहणार आहे.

सातारा : राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होत असून भाजप आणि महाविकास आघाडीने सहावी जागा प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे घोडेबाजार व इतर राजकीय घडामोडी टाळण्यासाठी आघाडीने अधिक दक्षता घेतली आहे. यातूनच जिल्ह्यातील आघाडीचे मंत्री आणि आमदारांनी बॅग भरून मुंबई गाठली. तर भाजपचे आमदारही तयारीने पोहोचत आहेत. शिवसेना आणि भाजप असे दोन्ही डगरीवर हात ठेवणाऱ्यांची मात्र गोची झाली आहे.राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जूनला निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेनेने खासदार संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर, राष्ट्रवादीने माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना संधी दिली. काँग्रेसकडून इम्रान प्रतापगडी निवडणूक लढवत आहेत. तर भाजपने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांना उतरवले आहे. वास्तविक पाहता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला होता. यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी बैठक झाली. पण, त्यामधून काहीही साध्य झाले नाही. त्यामुळे निवडणूक अटीतटीवर आली.  राज्यसभा निवडणुकीतील मतांचे गणित पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक, भाजपचे दोघेजण मतांच्या कोट्यानुसार निवडून येऊ शकतात. सहाव्या जागेसाठी खरी चुरस आहे. शिवसेनेने संजय पवार यांच्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर भाजपनेही धनंजय महाडिक यांना विजयी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. रस्सीखेचात राजकीय घडामोडी आणि आमदारांना गळाला लावण्याचे काम होऊ नये यासाठी महाविकास आघाडीने सावध पवित्रा घेतलाय.आघाडीतील आमदारांना मुंबईत बोलवून घेतले. पक्ष आदेशानुसार  सातारा जिल्ह्यातून पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण हे मुंबईला पोहोचले आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ही गेले आहेत. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार जयकुमार गोरे यांनीही मुंबई गाठली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही मुंबईकडे रवाना होणार आहेत.निवडणूक लागल्यापासून सतत चर्चा...राज्यसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सतत चर्चा सुरू आहे. सुरुवातीला संभाजीराजे छत्रपती यांच्या निर्णयावरून सुरुवात झाली. भाजपने त्यांना पुन्हा संधी दिली नाही, तर शिवसेनेने पक्षप्रवेश केल्यानंतर उमेदवारी देऊ असे स्पष्ट केले; पण त्यांनी नकार दिला. यामुळे भाजपने शिवसेनेवर टीका केली. ही चर्चा संपते तोच शिवसेनेने दुसरा उमेदवार म्हणून कोल्हापूरच्या संजय पवार यांना पसंदी दिली. हे पाहून भाजपनेही राजकीय खेळी करतानाच तिसरा उमेदवार धनंजय महाडिक यांच्या रूपाने जाहीर केला.महाडिक हेही कोल्हापूरचेच. त्यामुळेही चर्चा रंगली. आता तर सहावी जागा पदरात पाडून घेण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपने जोरदार तयारी केली आहे. खासकरून शिवसेनेने आपल्या सर्वच आमदारांना दोन दिवसांपूर्वीच मुंबईत बोलवून घेतले आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदारही मुंबईत पोहोचलेत.

आमदार हॉटेलात; अपक्षावर खरा खेळ !  शिवसेनेचे आमदार मुंबईतील हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. त्यांच्यावर शिवसैनिकांचं लक्ष आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपही आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहे. दोन्ही बाजूंनी जय्यत तयारी असताना या निवडणुकीत अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांवर निवडणुकीचे गणित अधिक पटीने अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी