राजवाडा-समर्थमंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST2021-01-08T06:07:15+5:302021-01-08T06:07:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राजवाडा बसस्थानक चाैक परिसरात वेडीवाकडी वाहने व रस्त्यावर भाजीपाला विक्री करणाऱ्या हातगाड्यांमुळे एक तास ...

राजवाडा-समर्थमंदिर
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राजवाडा बसस्थानक चाैक परिसरात वेडीवाकडी वाहने व रस्त्यावर भाजीपाला विक्री करणाऱ्या हातगाड्यांमुळे एक तास वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला असून, या ठिकाणी वाहतूक पोलिसांची कायमस्वरुपी नेमणूक करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
राजवाडा बसस्थानकाच्या पाठीमागे असणाऱ्या मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावर फळ व भाजी विक्रेते बसत असल्याने वारंवार वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहेत. या ठिकाणी वेडीवाकडी वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत होता.
..............................................................................
ढेबेवाडी पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार
तळमावले : ढेबेवाडी (ता. पाटण ) येथील सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांचा अखिल भारतीय संरक्षण समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज सांत, पदाधिकारी राजेंद्र सरकाळे, सचिन दुथडे, रघुनाथ पाटील, कुंडलिक मोरे यांच्यासह अखिल भारतीय संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.