शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'स्वाभिमानी'चे राजू शेळके एजंट, बिनविरोध निवडणुकीसाठी संपर्क केलेला - विक्रम पवार 

By नितीन काळेल | Updated: April 28, 2023 19:22 IST

एजंटगिरीशिवाय त्यांनी काही केले नाही

सातारा : ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेळके हे १०० टक्के एजंट आहेत. एजंटगिरीशिवाय त्यांनी कोणताही धंदा केला नाही. बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी किती रुपये देणार, असा निरोप त्यांनी दिला होता,’ असा दावा माजी सभापती विक्रम पवार यांनी केला आहे. सातारा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार यांनी सातारा बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर जोरदार टीकास्त्र सोडले.विक्रम पवार म्हणाले, ‘सातारा बाजार समितीची निवडणूक होत आहे. यासाठी आमचे सत्ताधारी गटाचे अजिंक्यतारा पॅनेल उभे आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेळके यांनी विक्रम पवार यांनी मोठ्या प्रमाणात पापं केल्याची टीका केली आहे. पण, मी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढून साडेसतरा एकर जमीन मिळविली. ही जागा बाजार समितीच्या नावावर करून विक्रम केलाय. राजू शेळके हे तर १०० टक्के एजंट माणूस आहे. त्यांच्याबाबत माहिती घेतल्यास बरेच काही लक्षात येईल.बाजार समिती निवडणुकीपूर्वी शेळके यांनी कोणामार्फत तरी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी निरोप दिला होता. चर्चा केली होती, असे सांगून विक्रम पवार पुढे म्हणाले, ‘सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. शेतकऱी बसतात तेथे पेव्हर ब्लाॅक, महिलांसाठी शाैचालय, ग्रामीण भागातील मुलांसाठी अभ्यासिका सुरू केली आहे.अनेकांच्या पोटात दुखत आहे...अनेक लोकांच्या पोटात दुखत आहे. दुसऱ्याच्या पोटात आहे तेच राजू शेळके यांच्या ओठातून बाहेर पडले आहे. पण, आताच्या निवडणुकीत त्यांची कपबशी फुटणार आहे. कारण, आम्ही चांगलं काम केलं हेच मतदानानंतर दिसून येईल, असा दावाही विक्रम पवार यांनी केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMarketबाजारElectionनिवडणूकSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना