रजनी पवारांच्या मुलावर हल्ला
By Admin | Updated: October 16, 2014 00:10 IST2014-10-16T00:02:09+5:302014-10-16T00:10:16+5:30
जावळीत ७० टक्के मतदान

रजनी पवारांच्या मुलावर हल्ला
सातारा : सातारा-जावळी मतदारसंघात बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान झाले. मतदानाचा टक्का या निवडणुकीत तरी वाढेल, अशी आशा उमेदवारांना होती. मात्र, ती फोल ठरली. सकाळी सात ते सायंकाळी सहा यावेळेत अवघे 62 टक्के इतके मतदान झाले. सातारा शहरात दुपारी अनेक मतदारसंघांवर शुकशुकाट होता. ऊन खाली झाल्यानंतर पुन्हा मतदानाचा वेग वाढला. एका मतदान केंद्रावर उमेदवाराच्या मुलावर हल्ला झाल्याची घटना घडली.
मतदान सुरू असताना काँगे्रसच्या उमेदवार रजनी पवार यांच्या पुत्राला मारहाण झाल्याची घटना मंगळवार पेठेतील एका मतदान केंद्रावर घडली. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, रजनी पवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. सदर बझार येथील मतदान केंद्रावर आले असताना मुलाला मारहाण झाल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ही घटना वगळता इतर ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. दुपारी बाराच्या सुमारास एका उमेदवाराचा मुलगा मंगळवार पेठेतील बूथवर पाहणी करण्यासाठी आला होता. त्यावेळी बूथपासून शंभर मीटरच्या आत असंख्य कार्यकर्ते उभे राहिल्याचे त्याने पाहिले आणि निवडणूक अधिकाऱ्यांना फोनवरून माहिती दिली. त्याच फोनवरून अधिकाऱ्यांनी ड्यूटीवर असलेल्या पोलिसांकडे त्याबाबत विचारणा केली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना मतदानकेंद्रापासून शंभर मीटरच्या रेषेबाहेर उभे राहण्यास सांगितले आणि बाचाबाची झाली. तक्रार करणारा उमेदवाराचा मुलगा आणि त्याच्या साथीदारांना त्यांनी मारहाण केली. संबंधित उमेदवारपुत्र आपल्या गाडीतून निघून जात असताना जमावाने त्याच्या गाडीवरही दगडफेक केली. तथापि, यासंदर्भात सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आलेली नव्हती. (प्रतिनिधी)
व्यापाऱ्यांनी दुपारी केले मतदान
सातारा शहरातील राजपथ तसेच कर्मवीर पथावर मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ भरते. सध्या. दिवाळी काही दिवसांवर आली असल्याने या दोन्ही रस्त्यांवर बाजारपेठ फुलली आहे. त्यामुळे व्यवसायाची गैरसोय होऊ नये, म्हणून व्यापारी पेठेतील काही व्यापाऱ्यांनी सकाळच्या टप्प्यात मतदान केले. तर काही व्यापारी व दुकानातील कामगारांनी दुपारी मतदान केले. दुपारच्या वेळेत ग्राहक कमी असतात. त्यामुळे मतदानासाठी कामगारांना काही वेळासाठी सोडले होते.
‘डोळस’ नागरिक : बुधवारी जागतिक अंध सहायता दिन साजरा झाला. ‘डोळे’ नसण्यापेक्षा ‘दृष्टी’ नसणे अधिक वाईट असते, हे विवेकानंदांचे बोल खरे करताना अंध मतदारांनी उत्साहात मतदान करून आपण ‘डोळस’ नागरिक असल्याचे दाखवून दिले.
मजुरांनी बजावला हक्क :
चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी झालेल्या मतदानात भरउन्हात इमारत बांधकामासाठी राबणाऱ्या हातांनीही हिरीरीने सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला. डोक्यावर ओझं असलं तरी त्याच्या ताणापेक्षा मतदान केल्याचंच मोठं समाधान या महिलेच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
जावळीत ७० टक्के मतदान
मेढा : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी झालेल्या मतदानात मेढा शहरात ६५ टक्के तर जावळी तालुक्यात ६५ ते ७० टक्के मतदान झाल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.
मेढा शहरात आठ मतदार केंद्रांवर शांततेत मतदान झाले. सकाळी अकरा वाजेपर्यंत १५ ते २० टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदारांनी गर्दी केली. सकाळी सात वाजता राष्ट्रवादीचे शिवेंद्रराजे भोसले, भाजपाचे दीपक पवार, शिवसेनेचे दगडूदादा सपकाळ यांनी यांनी तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या. मेढा शहरात एकूण ३२०० मतदारांपैकी २०४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जावळीत ७० टक्के मतदान
मेढा : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी झालेल्या मतदानात मेढा शहरात ६५ टक्के तर जावळी तालुक्यात ६५ ते ७० टक्के मतदान झाल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.
मेढा शहरात आठ मतदार केंद्रांवर शांततेत मतदान झाले. सकाळी अकरा वाजेपर्यंत १५ ते २० टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदारांनी गर्दी केली. सकाळी सात वाजता राष्ट्रवादीचे शिवेंद्रराजे भोसले, भाजपाचे दीपक पवार, शिवसेनेचे दगडूदादा सपकाळ यांनी यांनी तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या. मेढा शहरात एकूण ३२०० मतदारांपैकी २०४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.