खेळांना राजाश्रय महत्त्वाचा : पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:40 IST2021-09-03T04:40:47+5:302021-09-03T04:40:47+5:30
मसूर : ‘दिल्ली बहुत दूर है, ऑलिम्पिक प्रवास छोटा नाही. सात वर्षे सातत्य ठेवा, तेव्हाच आशिया व नंतर ऑलिम्पिक ...

खेळांना राजाश्रय महत्त्वाचा : पवार
मसूर : ‘दिल्ली बहुत दूर है, ऑलिम्पिक प्रवास छोटा नाही. सात वर्षे सातत्य ठेवा, तेव्हाच आशिया व नंतर ऑलिम्पिक स्पर्धांबाबत विचार होईल. खेळाला राजाश्रय मिळाल्याशिवाय खेळ वाढत नाही. मसूरकरांनी खेळासाठी भरीव योगदान द्यावे,’ असे प्रतिपादन राज्य क्रीडा पुरस्कार विजेते सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक संभाजी पवार यांनी केले.
मसूर स्पोर्टस् ग्रुप यांच्यावतीने हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी क्रीडा मार्गदर्शक इंद्रजित तनपुरे, मयूर साबळे, दिलीप माने, बंडा दळवी यांचा सत्कार करण्यात आला.
प्रा. कादर पिरजादे म्हणाले, ‘ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न ठेवून पैलवानांनी सातत्य ठेवून कष्ट करावेत. खेळाडूंनी मोबाईल, टीव्हीपासून दूर राहून गावाचे नाव मोठे करावे.’
अनिल जेधे म्हणाले, ‘ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक संभाजी पवार यांच्या संकल्पनेतील क्रीडा योजनांना सर्वांनी योगदान द्यावे.’
कुस्ती प्रशिक्षक सोमनाथ भोसले, माजी उपसरपंच संजय शिरतोडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी गोविंदराव जगदाळे, शिवाजीराव माने, प्रकाशबापू पाटील, दिलावर मुल्ला, अनिल जेधे, डॉ. जगन्नाथ मोरे, माजी उपसरपंच संजय शिरतोडे, चंद्रकांत नलवडे, चंद्रकांत कांबिरे, कासम पटेल, शरद जाधव, वैभव गुरव, राजेंद्र जगदाळे, सुनील माळी, भाऊसाहेब बर्गे उपस्थित होते. डॉ. जगन्नाथ मोरे यांनी स्वागत केले. एस. एस. पवार यांनी आभार मानले.