संजयनगर शाळेसमोर गतिरोधक उभारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:41 IST2021-08-27T04:41:51+5:302021-08-27T04:41:51+5:30
निवेदनात म्हटले आहे की, संजयनगर-शेरे येथील जिल्हा परिषद शाळेची स्थापना १ जुलै १९८३ रोजीची आहे. शाळेचा पट ४७ ...

संजयनगर शाळेसमोर गतिरोधक उभारा!
निवेदनात म्हटले आहे की, संजयनगर-शेरे येथील जिल्हा परिषद शाळेची स्थापना १ जुलै १९८३ रोजीची आहे. शाळेचा पट ४७ असून शाळेसमोर शेणोली स्टेशन-सोनसळ फाटा ते सोनसळ गाव असा वाहतुकीचा रस्ता आहे. या रस्त्यावर सतत रहदारी असते. हा रस्ता शाळेलगत असल्याने विद्यार्थी ये-जा करीत असतात. या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. त्यामध्ये काही जण जखमी झाले आहेत. रस्त्यावरील वाढती रहदारी आणि वाहनांचा वेग यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर गतिरोधक उभारावेत. तसेच दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
या वेळी भटक्या विमुक्त बहुउद्देशीय गोपाळ समाज सामाजिक संघटनेचे राज्याध्यक्ष सुदामराव जाधव, शाखा अध्यक्ष सागर चव्हाण, उपाध्यक्ष रोहित पवार यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.