शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
3
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
4
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
5
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
6
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
7
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
9
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
10
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
11
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
12
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
13
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
14
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
15
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
16
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
17
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
18
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
19
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
20
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला; कोयना धरणात पाण्याची आवक कमी

By नितीन काळेल | Updated: July 27, 2024 18:42 IST

आठवड्यानंतर सूर्यदर्शन, कोयना धरणात ७ दिवसांत ३२ टीएमसी पाणी..

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात सहा दिवस कोसळणाऱ्या पावसाचा जोर कमी झाला आहे. २४ तासांत महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक १८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणातील पाणीसाठा ८३ टीएमसीवर पोहोचला आहे. त्यातच पावसाचा जोर मंदावल्याने धरणातील आवक कमी झाली आहे. साताऱ्यातही आठवड्यानंतर सूर्यदर्शन झाले.जिल्ह्यात मागील रविवारपासून जोरदार पाऊस सुरू होता. पूर्व भागातही चांगला पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला, तर पश्चिमेकडे कोसळधार होती. प्रमुख धरण पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस झाला. यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढला. मात्र, शुक्रवारपासून पावसाचा जोर मंदावला आहे. यामुळे सर्वच धरणांत पाण्याची आवक कमी होत आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ९३ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. नवजा येथे १०५ आणि महाबळेश्वरला १८२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात सुमारे ४६ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ८२.९८ टीएमसी झाला. त्याचबरोबर कोयना धरणातून विसर्ग सुरूच आहे. पायथा वीज गृहाच्या दोन्ही युनिटमधून २ हजार १०० आणि सहा दरवाजांतून ३० हजार, असा एकूण ३२ हजार १०० क्युसेक पाणी विसर्ग केला जात होता. त्यामुळे कोयना नदीतील पाणीपातळी वाढलेलीच आहे. सातारा शहरातही सहा दिवसांनंतर पावसाची उघडझाप सुरू झाली. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास सूर्यदर्शनही झाले. त्यानंतर रिमझिम पाऊस पडला.

कोयना धरणात ७ दिवसांत ३२ टीएमसी पाणी..कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जुलै महिना सुरू झाल्यापासून चांगला पाऊस झाला. त्यातच मागील आठवड्यापासून कोसळधार होती. यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढला. मागील सात दिवसांत धरणात ३२ टीएमसीहून अधिक पाणीसाठा वाढला आहे. तर सध्या कोयनेबरोबरच कण्हेर धरणातून विसर्ग सुरू आहे. वाई तालुक्यातील बलकवडी धरण क्षेत्रातही पावसाचा जोर होता. धरणात ३.३६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण ८२.३५ टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण