शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; कोयना धरण पाणीसाठ्यात दीड टीएमसीने वाढ 

By नितीन काळेल | Updated: July 18, 2023 12:54 IST

जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही पावसाची दडी कायम

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आणखी वाढला असून मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक १५० मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणातही येणाऱ्या पाण्याचीही आवक वाढली आहे. त्यामुळे धरण पाणीसाठ्यात जवळपास दीड टीएमसीने वाढ झाली. सकाळच्या सुमारास २७.२७ टीएमसी पाणीसाठा झाला होता.पश्चिम भागात चार दिवसांच्या उघडझापनंतर शनिवारपासून पावसाचा जोर वाढला. रविवारी आणि सोमवारीही पश्चिमेकडील कास, बामणोली, नवजा, कोयना, तापोळा तसेच महाबळेश्वर परिसरात जोरदार पाऊस पडला. यामुळे त्या भागातील ओढे, नाले पुन्हा भरुन वाहत आहेत. तसेच भात लागणीच्या कामालाही वेग आला आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक पाऊस १५० मिलीमीटर पडला. तर एक जूनपासून आतापर्यंत येथे १६६७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. त्याचबरोबर २४ तासांत कोयनेला ७७ आणि नवजा येथे ९८ मिलीमीटर पाऊस पडला. तर जूनपासून कोयनानगर येथे ११४९ आणि नवजाला १६५७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. पश्चिम भागातील या पावसामुळे धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळीसह कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही वाढली आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात १६ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे पाणीसाठा २७.२७ टीएमसी झाला होता. २४ तासांत पाणीसाठ्यात जवळपास दीड टीएमसीने वाढ झालेली आहे. तरीही कोयनेत गतवर्षीपेक्षा कमीच पाणीसाठा आहे. पावसाने आणखी जोर धरुन सतत १५ दिवस पाऊस पडल्यास धरणपातळीत मोठी वाढ होईल, असा अंदाज आहे.दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही पावसाची दडी कायम आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरणी खोळंबलेली आहे. सध्या दुष्काळी भागात पेरणी होणार नाही. पण, रब्बी हंगामासाठीतरी चांगला पाऊस पडावा, अशी अपेक्षा बळीराजांची आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान