शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

महाबळेश्वरचा पाऊसही चार हजारी; कोयनेत ७५ टक्के पाणीसाठा

By नितीन काळेल | Updated: August 3, 2023 12:09 IST

कोयना, नवजा आणि महाबळेश्वर परिरसरात पावसाची संततधार कायम

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून २४ तासांत सर्वाधिक पाऊस नवजा आणि महाबळेश्वरला प्रत्येकी १३० मिलीमीटर झाला. तर आता महाबळेश्वरच्या पावसानेही आता चार हजार मिलीमीटरचा टप्पा गाठला. त्याचबरोबर कोयना धरणात ७८ टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरण ७५ टक्के भरले आहे.जिल्ह्याच्या पश्चिमेकडे चार दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. असे असले तरी कोयना, नवजा आणि महाबळेश्वर परिरसरात पाऊस कायम आहे. तसेच पश्चिमेकडेच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी आणि कोयनासारखी प्रमुख धरणे आहेत. या धरणांची एकूण साठवण क्षमता ही १४५ टीएमसीच्यावर आहे. या धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने पाणीसाठा झपाट्याने वाढत चालला आहे.१०५.२५ टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणात तर गुरुवारी सकाळच्या सुमारास ७८.२२ टीएमसी पाणीसाठा झाला होता. टक्केवारीत हे प्रमाण ७४.३२ झालेले आहे. तर धरणात येणाऱ्या पाण्याचीही आवक वाढली. गुरुवारी सकाळी ३० हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे लवकरच धरणातील पाणीसाठा ८० टीएमसीचा टप्पा ओलांडू शकतो. तर पायथा वीजगृहाची दोन्हीही युनीट सुरू आहेत. या युनीटमधून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे.गुरुवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८७ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजाला आणि महाबळेश्वरला १३० मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. तर एक जूनपासूनचा विचार करता आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे ४२४५ मिलीमीटर झाला. त्यानंतर महाबळेश्वरला ३९७९ आणि कोयनानगरला ३०१० मिलीमीटर पडलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानKoyana Damकोयना धरण