शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

कोयना परिसरात पाऊस सुरूच : साठा १८ टीएमसीच्या वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 13:06 IST

जिल्ह्याच्या पूर्व भागात उघडीप कायम असून पश्चिमेकडे धरणक्षेत्र परिसरात मात्र पाऊस कायम आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढू लागलाय. शुक्रवारी सायंकाळपर्यंत

ठळक मुद्देपूर्वेकडे मात्र उघडीप कायम 

सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात उघडीप कायम असून पश्चिमेकडे धरणक्षेत्र परिसरात मात्र पाऊस कायम आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढू लागलाय. शुक्रवारी सायंकाळपर्यंत कोयनेत १८.१६ टीएमसी साठा झाला होता. तर जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे आणि गुरूवारी दिवसभरात एकूण १२२.३१ व २४ तासांत सरासरी ९.६९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात २२ जून नंतर मान्सूनचे आगमन झाले. तेव्हापासून सतत कोठे ना कोठे पाऊस होतच आहे. सुरूवातीच्या काळात माण, खटाव, फलटण, कोरेगाव अशा तालुक्यात कमी अधिक फरकाने पाऊस झाला. मात्र, नंतर या पावसाने उघडीप दिलेली आहे. तर पश्चिम भागात सुरुवातीपासून पाऊस कोसळतोय. कधी कमी, कधी अधिक पाऊस होत आहे. मात्र, कोयना धरण परिसर, नवजा, महाबळेश्वर, बामणोली, तापोळा भागात सतत पाऊस आहे. कधी- कधी जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. 

जिल्ह्यात सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंतच्या एकूण पावसाची आकडेवारी मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- १८.८७ (३०५.५३), जावळी- १७.१५ (३२५.०२), पाटण-१५.५५ (२४१.६१), कºहाड -६.६९ (१६४.२३), कोरेगाव- २.७८ (१५२.२२), खटाव- २.४३ (९३.२४), माण - ०.२९ (६३.७०), फलटण - ० (५८.३३), खंडाळा- ०.५० (९५.६०), वाई- ३.८६ (१४३.२७), महाबळेश्वर-५४.२० (१०८५.०३). याप्रमाणे आजपर्यंत एकूण २७२७.७७ तर सरासरी २१२.७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.शुक्रवारी सायंकाळी कोयना धरणाची पाणीपातळी २०५१ फूट झाली असून १८.१६ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला होता. तर             धरणक्षेत्रात झालेल्या पावसाची आणि कंसात आतापर्यंतची  पावसाची आकडेवारी मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कोयना  -७६ (८७३), नवजा - ४४ (१०६९) तर महाबळेश्वर ६५ (१०७९) .

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण