शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अतिवृष्टीचा १३२ पाणी योजनांना फटका, सव्वा लाख नागरिक बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 4:08 PM

पश्चिम भागातील अतिवृष्टीनंतर आता नुकसानीच्या घटना समोर येऊ लागल्या असून पाच तालुक्यातील १३२ पाणी योजनांनाही याचा फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक ८६ योजना या पाटण तालुक्यातील आहेत. तर सर्व योजनांच्या दुरुस्तीसाठी साडे तीन कोटीहून अधिक खर्च येणार आहे. सध्या बाधित असणाऱ्या सव्वा लाखाहून अधिक नागरिकांना टँकर, विहिरी, हातपंपाचाच आधार उरलाय.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा १३२ पाणी योजनांना फटका, सव्वा लाख नागरिक बाधित साडे तीन कोटी रुपये लागणार दुरुस्तीसाठी

सातारा : पश्चिम भागातील अतिवृष्टीनंतर आता नुकसानीच्या घटना समोर येऊ लागल्या असून पाच तालुक्यातील १३२ पाणी योजनांनाही याचा फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक ८६ योजना या पाटण तालुक्यातील आहेत. तर सर्व योजनांच्या दुरुस्तीसाठी साडे तीन कोटीहून अधिक खर्च येणार आहे. सध्या बाधित असणाऱ्या सव्वा लाखाहून अधिक नागरिकांना टँकर, विहिरी, हातपंपाचाच आधार उरलाय.जिल्ह्यात जुलै महिन्याच्या शेवटपासून पावसाचा जोर राहिला तो आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम होता. पश्चिम भागात तर पावसाने कहर केला. यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले. अनेक गावांचा संपर्क तुटला होता. या अतिवृष्टीमुळे रस्ते, घरे, शाळा, अंगणवाड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच या अतिवृृष्टीचा फटका पाणी योजनांनाही बसलाय.पाटण, महाबळेश्वर, जावळी, खंडाळा आणि कऱ्हाड तालुक्यातील पाणी योजनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वाधिक पाणी योजना या पाटण तालुक्यातील ८६ आहेत. तर इतर तालुक्यातीलही योजनांना याचा फटका बसला आहे. यामुळे ९२ हजार ६४८ नागरिक बाधीत आहेत. या लोकांना आड, वहिरीतील पाण्याचा आधार राहिलाय. तसेच महाबळेश्वर तालुक्यातील २३ योजनांनाही फटका बसला आहे. त्यामुळे १२ हजार ६४७ नागरिकांवर पाणी शोधण्याची वेळ आली आहे.या अतिवृष्टीमुळे महापूर आल्याने विहिरीत गाळ जाणे, पाईपलाईनचे नुकसान, मोटार वाहून जाणे, वीज खांब पडणे अशा नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील १३२ पाणी योजनांसाठी जवळपास ३ कोटी ६४ लाख ७७ हजार रुपये खर्च येणार आहे. त्यानंतरच ग्रामस्थांना पाणी योजनांचे पाणी मिळणार आहे. सध्या पाणी योजना नसणारे ग्रामस्थ हातपंप, विहिरी, टँकरचे पाणी पित आहेत.नुकसानीची माहिती अशीतालुका          नुकसान योजनांची संख्या             बाधित लोकसंख्या         अंदाजे खर्चपाटण -            ८६                                               ९२६४८                            १ कोटी ९४ लाखमहाबळेश्वर-    २३                                               १२६४७                           १ कोटी २१ लाख ५० हजारजावळी -            १                                                     ४२६                           ५ लाखखंडाळा -             ३                                                 १४२६                            ७ लाख ४३ हजारकऱ्हाड -            १९                                                २२१३६                         ३६ लाख ४४ हजार

टॅग्स :Satara Floodसातारा पूरSatara areaसातारा परिसर