शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
5
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
6
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
7
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
8
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
9
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
10
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
11
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
12
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
13
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
14
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
15
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
16
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
17
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
18
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
19
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
20
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."

पावसाचे चक्र बदलले, पेरणीचे नियोजन बिघडले; सातारा जिल्ह्यात शेकडो हेक्टर क्षेत्र नापेरची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 16:33 IST

अंतिम टप्प्यातील पेरणी सुरूच

सातारा : पावसाचे चक्र बदलल्याने यावर्षी जिल्ह्यात मे आणि जूनमध्ये ही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे वेळेत वाफसा न आल्याने खरीप पेरणीवर परिणाम झाला. त्यातच आता ऑगस्ट महिना सुरू असला तरी अंतिम टप्प्यातील पेरणी सुरूच आहे. सुमारे पावणे तीन लाख हेक्टरवर पेर पूर्ण झालेली आहे. याचे प्रमाण ९१ टक्के आहे. तरीही यावर्षी शेकडो हेक्टर क्षेत्र नापेर राहण्याची ही शक्यता आहे.जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वांत मोठा समजला जातो. यावर्षी खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ९७ हजार ९१३ हेक्टर निश्चित करण्यात आलेले आहे. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक ९२ हजार ८७५ हेक्टर आहे. तर भाताचे ४७ हजार ४९२, खरीप ज्वारी ६ हजार, बाजरीचे ५० हजार ३५१, मका पिकाचे १३ हजार १५३, भुईमूग ३१ हजार हेक्टर राहण्याचा अंदाज होता तसेच इतर पिकांचे क्षेत्र कमी प्रमाणात आहे; पण यावर्षी पाऊस वेळेत झाला; पण सतत पाऊस असल्याने पेरणीसाठी वेळेत वाफसा आलाच नाही. त्यामुळे पेरणी पुढे गेली. आता तर ऑगस्ट महिना सुरू आहे. त्यामुळे खरिपातील पेरणी १०० टक्के होण्याची शक्यता कमी आहे.खरिपात आतापर्यंत भाताची सुमारे ४२ हजार हेक्टरवर लागण झालेली आहे. हे ८८ टक्के प्रमाण आहे. खरीप ज्वारीची ८५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बाजरीची सुमारे ३७ हजार हेक्टरवर पेर पूर्ण झाली आहे. ७३ टक्के ही पेर आहे. पेरणीची वेळ निघून गेल्याने यंदाही बाजरीचे क्षेत्र कमीच राहणार आहे. मका पिकाची २६ हजार ७१२ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. २०३ टक्के ही पेर आहे. तसेच अजूनही मका पिकाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. भुईमुगाची २५ हजार २७२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ८२ टक्के हे प्रमाण आहे.जिल्ह्यात मागील तीन वर्षांत सोयाबीन क्षेत्रात वाढ झाली आहे. यावर्षी आतापर्यंत सुमारे ८० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. ८६ टक्के पेरणी पूर्ण आहे. तसेच तूर, मूग, उडीद, कारळा, सूर्यफूल या पिकाखालील क्षेत्र कमी आहे.

फलटण तालुक्यात १०७ टक्के पेरणी पूर्ण..जिल्ह्यात खरीप हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात आहे. सध्या जिल्ह्याच्या पश्चिम डोंगराळ भागात भात लागण सुरू आहे. फलटण तालुक्यात सर्वाधिक १०७ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. तर सातारा तालुक्यात ७७ टक्के, जावळी तालुक्यात ८० टक्के, पाटण ७८, कऱ्हाड ९२, कोरेगाव ९०, खटाव १०६, माण १०३, खंडाळा १०२, वाई ८८ आणि महाबळेश्वर तालुक्यात ८४ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. माण, खटाव, फलटण, खंडाळा या तालुक्यात बाजरी पिकाचे क्षेत्र घटले आहे.