शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दहिवडी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक ठिकाणी झाडे पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 17:24 IST

दिवसभर असह्य झालेल्या उकाड्याने हैराण झालेल्या दहिवडीकरांना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. विजेचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यामुळे दहिवडी परिसरातील मोठमोठी झाडेही कोलमडून पडली होती. दहिवडीच्या मुख्य चौकात अनेक वृक्ष उन्मळून पडले. नगरपंचायत कार्यालयासमोरही अनेक झाडे मोडून पडली.

ठळक मुद्देदहिवडी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक ठिकाणी झाडे पडली दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या ग्रामस्थांना दिलासा

दहिवडी : दिवसभर असह्य झालेल्या उकाड्याने हैराण झालेल्या दहिवडीकरांना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. विजेचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यामुळे दहिवडी परिसरातील मोठमोठी झाडेही कोलमडून पडली होती. दहिवडीच्या मुख्य चौकात अनेक वृक्ष उन्मळून पडले. नगरपंचायत कार्यालयासमोरही अनेक झाडे मोडून पडली.माण तालुक्यात काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. वातावरणात उकाडा जाणवत असल्याने दहिवडी परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच बुधवारी रात्री अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. सोसाट्याचे वारे वाहू लागले. सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली.सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे दहिवडीच्या मुख्य चौकात लिंबाची डहाळी वीजवाहक तारेवर पडल्याने तारा तुटल्या. याशिवाय खांबही मोडल्याने दहिवडीतील नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागली. काही ठिकाणी रस्त्यावरही झाडे पडल्याचे चित्र होते. या पावसाने शेतातील कांदा पिकाला मोठा तडाखा बसला. तर कडवळ, मका भुईसपाट झाली होती.वातावरणात रात्रभर गारवा होता. मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. सकाळी सर्व झाडे बाजूला काढण्याचे काम सुरू होते. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.

तारा अनेक दुकानच्या समोरच पडल्याने भीतीचे वातावरणही निर्माण झाले होते. फलटण चौकात सगळीकडेच झाडे पडले होते. दिवसभर झाडे हटवण्यासाठी वीजवितरण कंपनी, बांधकाम विभाग, नगरपंचायतीचे कर्मचारी परिश्रम घेत होते. 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर