शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप; कोयनेत ६४ टीएमसीवर साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 13:40 IST

धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरुच

सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची दडी असली तरी पश्चिम भागातही आता उघडीप आहे. बुधवारी सकाळपर्यंत नवजाला १२ आणि महाबळेश्वर येथे १० मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणातील पाणीसाठा ६४ टीएमसीवर पोहोचला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात जुलै महिना सुरु झाल्यापासून पावसाला सुरुवात झाली. सलग १५ दिवस जोरदार पाऊस झाला. पण, मागील आठवड्यापासून पावसाचा जोर हळूहळू कमी होत गेला. सध्यातर पश्चिम भागात पावसाची उघडीप असल्यासारखी स्थिती आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे काहीच पाऊस झाला नाही. मात्र, नवजाला १२ आणि महाबळेश्वरमध्ये १० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर एक जूनपासून कोयनेला २२३०, नवजामध्ये २८५८ आणि महाबळेश्वर येथे २९९२ मिलीमीटर पाऊस पडला आहे.दरम्यान, कोयना धरणक्षेत्रात पाऊस अत्यल्प आहे. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात ५,५१० क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ६४.२५ टीएमसी झाला होता. टक्केवारीत हे प्रमाण ६१.०४ इतके आहे. त्याचबरोबर धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरुच होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण