शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
4
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
5
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
6
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
7
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
8
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
9
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
10
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
11
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
12
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
13
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
14
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
15
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
16
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
17
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
18
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
19
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
20
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने काढलं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं दिवाळं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 18:07 IST

सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी भलतेच पेचात सापडले आहेत. आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील गाळप योग्य असणारा २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस साठलेल्या पाण्यात तरंगत आहे.

ठळक मुद्देहंगाम लांबण्याची भीती २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस पाण्याखाली

सागर गुजरसातारा : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी भलतेच पेचात सापडले आहेत. आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील गाळप योग्य असणारा २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस साठलेल्या पाण्यात तरंगत आहे. या पावसाने शेतकऱ्यांचं दिवाळं काढलं आहे. शेतामध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने कारखान्याला ऊस केव्हा जाणार ? हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.सातारा जिल्ह्यामध्ये गाळप योग्य उसाचे ८० हजार २१४ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील उसाचे नुकसान झाले आहे. कृषी खात्याने नजरअंदाजे याचे अनुमान काढले आहे. अजून पंचनामे चालू आहेत, त्यामुळे नंतर तोडणीयोग्य झालेल्या उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान लक्षात येणार आहे. उसाच्या आधारावर आर्थिक व्यवहार करणाऱ्या शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी पावसाने काही उसंत दिलेली नाही. ऊस तोडणीची लगबग दोन कारणाने थांबलेली आहे. एका बाजूला मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय, त्यामुळे शेतामध्ये चिखलाचे साम्राज्य आहे, दुसऱ्या बाजूला साखर कारखान्यांना अद्यापही गाळप परवाने मिळाले नाहीत.दरम्यान, जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस गाळप परवाना मिळवण्यासाठी सप्टेंबर महिन्यातच साखर आयुक्तांना प्रस्ताव सादर केले आहेत. परंतु मंत्री समितीची बैठकच झाली नसल्याने या प्रस्तावांना मंजुरी मिळालेले नाही. जरी गाळपाचे परवाने मिळाले असते तरी कोसळत्या पावसात शेतामधून कारखान्याला ऊस देणे सोपे नव्हते.

साहजिकच मंत्री समितीची बैठक होऊन जरी परवाने मिळाले असते तरी ऊस वाहतुकीमध्ये किंवा ऊस तोडणीमध्ये पावसाचा व्यत्यय आलाच असता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये यंदा उसाचा हंगाम मार्चअखेरपर्यंत चालेल, असा अंदाज आहे. गतवर्षी उसाची लागवड घटल्याने मार्चअखेरपर्यंत हंगाम संपला. यात वाढ ऊसक्षेत्र असते तर कदाचित जून महिनाही यासाठी लागला असता, असा अंदाज साखर कारखानदार व्यक्त करतात.उसाचा गाळप हंगाम साधारणत: चौदा ते पंधरा महिन्यांपर्यंत चालतो. यंदा मात्र तो १४ ते १७ महिन्यांपर्यंत चालेल, अशी शक्यता आहे. उशिरा पक्व होणाऱ्या उसाला १४ ते १७ महिन्यांत तोडला तरी कुठलाही तोटा नसतो; परंतु १२ ते १५ महिन्यांत परिपक्व होणाऱ्या उसाला तेवढ्याच कालावधीत तोडणे गरजेचे असते, अन्यथा उशिरा तोड झाली तर उसाच्या वजनात घट येते. साखर उत्पादनातही घट येते. त्याचा परिणाम साखर कारखान्यांच्या रिकव्हरीवर प्रतिकूल असा होतो. साहजिकच उशिरा पक्व होणाऱ्या उसाचे चांगले वजन वाढले तर लवकर पक्व होणारा ऊस वजनात घटेल, अशी परिस्थिती आहे.दरम्यान, सातारा जिल्ह्यातील ऊसतोडीसाठी अहमदनगर, मराठवाडा, विदर्भ या भागातून ऊस मजूर येतात. यंदा त्या भागातही उसाचे उत्पादन घटले असल्याने जिल्ह्यातील ऊस कारखान्यांना मजुरांचा तुटवडा जाणवणार नाही. सध्या त्यांच्या भागात रब्बीच्या पेरणीमध्ये हे मजूर गुंतलेले आहेत. या पेरण्या संपल्या की मजुरांच्या टोळ्या सातारा जिल्ह्यात दाखल होतील.शेतातल्या वाटांवर चिखलाचे साम्राज्यपावसाने अद्याप उसंत दिलेली नाही. ऊसतोडीची वेळ आली, तरीदेखील पाऊस पडत असल्याने शेतातल्या वाटांवर चिखलाचे साम्राज्य आहे. या परिस्थितीमध्ये शेतातून ऊस बाहेर कसा काढायचा, हाही प्रश्न सतावत आहे. 

ऊस उत्पादक शेतकऱ्याचे आधीच पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी ऊस पावसाच्या पाण्यात पडल्याने उसाचे डोळे फुटले. यामुळे उत्पादनात घट होणार आहे. आम्ही शेतकऱ्यांचे कुठल्याही परिस्थितीत नुकसान होऊ देणार नाही. सगळ्या उपलब्ध असलेल्या उसाची तोड केली जाणार आहे.- एस. एन. दळवीकार्यकारी संचालक कृष्णा सहकारी साखर कारखाना रेठरे बुद्र्रुक, कऱ्हाड 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर