शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कोयना क्षेत्रात पाऊस; धरणात पाण्याची आवक सुरु, सध्या किती आहे पाणीसाठा.. जाणून घ्या

By नितीन काळेल | Updated: June 2, 2025 19:32 IST

नवजा २६, महाबळेश्वरला २४ मिलिमीटरची नोंद 

नितीन काळेल सातारा : जिल्ह्यात मे महिन्यात वळवाचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, तर जून महिना सुरू झाल्यापासून पश्चिम भागातील कोयना क्षेत्रात पाऊस सुरू झाला आहे. २४ तासात नवजा येथे २६, तर महाबळेश्वरला २४ मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे काेयना धरणात यंदा लवकरच पाणी आवक सुरू झाली आहे. धरणात सध्या २२.७३ टीएमसी पाणीसाठा आहे.जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या - दुसऱ्या आठवड्यात दाखल होतो. त्यानंतरच पश्चिम भागात पावसाला सुरुवात होते. त्यानंतर कोयना धरणातही पाणी आवक होते. पण, यावर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात जिल्ह्यातच वळवाचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे.पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण तालुक्यात तर धो-धो पाऊस कोसळला. यामुळे उन्हाळ्यातच तलाव भरले होते. तसेच ओढे भरून वाहू लागले आहेत, तर पश्चिम भागातही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जंगलातूनही पाणी वाहू लागले आहे. अशातच जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाची उघडीप असली तरी पश्चिमेकडील कास, बामणोली, कोयना, नवजा, महाबळेश्वर भागात पाऊस पडत आहे.

सोमवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजा येथे २६ आणि महाबळेश्वरला २४ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. १ जूनपर्यंत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला एकूण ३२ मिलिमीटर झाला आहे. कोयना धरणात एकूण २२.७३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हा साठा २१.६० टक्के इतका आहे.

१,३३६ क्यूसेक आवक सुरूकोयना धरण परिसरात साधारणपणे १० जूननंतर पावसाला सुरुवात होते. जून महिन्याच्या उत्तरार्धापासून पाऊस जोर धरतो. त्यानंतरच धरणात पाण्याची सावकाशपणे आवक सुरू होते. पण, यंदा उन्हाळ्यातच कोयना क्षेत्रात दमदार पाऊस झाला. त्यानंतर मान्सूनचा पाऊसही वेळेपूर्वी सुरू झाला. मागील दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. यामुळे धरणात आवक सुरू झाली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास १ हजार ३३६ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. यंदा धरणात पाणी आवक लवकर सुरू झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणRainपाऊस