सज्जनगड-ठोसेघर रस्त्यावर सैराट पर्यटकांचा ‘रेन डान्स’

By Admin | Updated: July 18, 2016 00:27 IST2016-07-18T00:25:50+5:302016-07-18T00:27:26+5:30

झिंग झिंग झिंगाट : वाहतुकीची कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा; सेल्फी काढणं बेतू शकतंय जीवावर

'Rain Dance' of Sarat tourists on Sajjangad-Choseghar road | सज्जनगड-ठोसेघर रस्त्यावर सैराट पर्यटकांचा ‘रेन डान्स’

सज्जनगड-ठोसेघर रस्त्यावर सैराट पर्यटकांचा ‘रेन डान्स’

सातारा : सलग सुट्या साजऱ्या करण्यासाठी हजारो पर्यटकांची पावले ठोसेघर, सज्जनगड, कास पठाराकडे वळायला लागली आहेत. काही पर्यटक भर रस्त्यातच सैराट होऊन झिंगाट ‘रेन डान्स’ करत होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वत्र हिरवळ पसरली असून, धबधबे वाहू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्याबरोबर पुणे-मुंबईचे पर्यटक कास, सज्जनगड, ठोसेघरकडे येऊ लागले आहेत.
पावसाच्या दिवसात ठोसेघर, सांडवली, भांबवली, केळवली हे धबधबे चाळकेवाडीचे पवनचक्क्यांचे पठार, कास तलाव, उरमोडी धरण, सज्जनगड पाहण्यासाठी तरुणाईबरोबरच निसर्गप्रेमी आबालवृद्ध या परिसरातला भेट देत असतात.
या परिसरात पर्यटकांची रविवारीही चांगली गर्दी झाली होती. वळणा-वळणावर युवकांचे टोळकं भर पावसात रेन डान्स करत होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाल्याने वादावादीचे प्रकार घडत होते. हुल्लडबाज पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखा व पोलिस अपुरे पडत असल्याचे दिसत होते.
ठोसेघर रस्त्यावर बोरणे घाटात चाळकेवाडी, उरमोडी धरण, यवतेश्वर, सांबरवाडी परिसरात रस्त्याच्या कडेला गाडी लावून मोठ्या आवाजात गाणी लावून युवकांचा दंगा सुरू असतो. (प्रतिनिधी)

Web Title: 'Rain Dance' of Sarat tourists on Sajjangad-Choseghar road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.