शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात पाऊस सुरूच; कोयनेतील विसर्ग बंद

By नितीन काळेल | Updated: June 10, 2024 18:34 IST

खरीप पेरणीला वेग येणार : शेतकऱ्यांकडून खते, बियाण्यांची जुळवाजुळव

सातारा : जिल्ह्यातील मागील चार दिवसांपासून पाऊस पडत असून खरीप हंगामासाठीही उपयुक्त ठरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पेरणीसाठी खते आणि बियाण्यांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. तर कोयना धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरणात सध्या १५.२३ टीएमसी साठा आहे.जिल्ह्यात मे महिन्यात वळवाचा पाऊस कमी झाला. त्यामुळे संपूर्ण लक्ष मान्सूनच्या पावसाकडे होते. त्यातच मागील तीन वर्षांचा इतिहास पाहता मान्सून १० जून नंतरच जिल्ह्यात दाखल झाला. त्यानंतरही पावसाची दडी होती. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीवर परिणाम झाला होता. परिणामी यंदा तरी मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. कारण, जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने चारा आणि पाण्याची स्थिती बिकट होती. घोटभर पाण्यासाठी ही लोकांना टॅंकरवर अवलंबून रहावे लागत होते. असे असतानाच यंदा मान्सूनचा पाऊस वेळेवर दाखल झाला आहे.सातारा जिल्ह्यात ६ जूनला मान्सून दाखल झाला. गुरूवारी सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. पश्चिमेकडील कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तसेच पूर्वेकडील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात दुष्काळी स्थिती आहे. शेकडो गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येतोय. अशातच या भागातही पावसाने दमदार सलामी दिली आहे. सलग तीन दिवस पाऊस कोसळत होता. यामुळे अनेक गावांतील ओढे भरुन वाहिले. तसेच शेतीचेही नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक गावांतील बंधाऱ्यात बऱ्यापैकी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना पाणी देताना याचा फायदाच होणार आहे.मान्सूनचा पाऊस वेळेत झाल्याने खरीप हंगामातील पेरणीला सुरूवात होणार आहे. त्यातच काही भागात दमदार पाऊस झाल्याने जमिनीला वाफसा नाही. त्यामुळे तेथील पेरणी पुढे जाणार आहे. तरीही शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पेरणीसाठी जोरदार तयारी केली आहे. खते आणि बियाणे दुकानात शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.

महाबळेश्वरला १५ मिलीमीटर पाऊस..जिल्ह्यात रविवारीही पाऊस पडला. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला १५ मिलीमीटर झाला. तर कोयनानगर येथे ३ आणि नवजाला ९ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे १०२ मिलीमीटर पडलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस