शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

सातारा जिल्ह्यात पाऊस सुरूच; कोयना धरणात ८० टीएमसी पाणीसाठा 

By नितीन काळेल | Updated: August 4, 2023 13:07 IST

१९ हजार क्यूसेकने आवक : नवजाला ११६ मिलीमीटर पावसाची नोंद

सातारा : पश्चिम भागात पाऊस सुरूच असून कोयना धरणक्षेत्रातही चांगला पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढत चालला आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास धरणात ७९.७० टीएमसी साठा झालेला. तर धरणात १९ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. दरम्यान, २४ तासांत सर्वाधिक पाऊस नवजाला ११६ मिलीमीटर झाला आहे.मागील सव्वा महिन्यापासून जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यातही वेगाने वाढ होत आहे. धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, बलकवडी आदी प्रमुख धरणांत ७० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झालेला आहे. तर कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. धरणात शुक्रवारी सकाळच्या सुमारास ७९.७० टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणात १९ हजार २९७ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरणात गेल्यावर्षीपेक्षा यंदा अधिक पाणीसाठा झालेला आहे. तर कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ५० मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे ११६ आणि महाबळेश्वरला ४७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. त्याचबराेबर एक जूनपासूनचा विचार करता काेयनेला ३०६० मिलीमीटर पाऊस झालेला आहे. तर नवजा येथे ४३६१ आणि महाबळेश्वरला ४०२६ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. या तीनही ठिकाणी यंदा चांगला पाऊस झालेला आहे. सध्या पावसाचा जाेर कमी झाला असलातरी दररोज हजेरी आहे. यामुळे पश्चिम भागातील ओढे खळाळून वाहत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण