शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी, कोयना धरणात पाण्याची आवक वाढली 

By नितीन काळेल | Updated: August 14, 2023 12:38 IST

महाबळेश्वरला ५३ मिलीमीटरची नोंद

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असून सोमवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ५३ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर कोयना क्षेत्रातही पाऊस पडत असल्याने धरणात आवक वाढली आहे. त्यामुळे सकाळच्या सुमारास धरणसाठा ८३.७३ टीएमसी झाला होता. तर धरणातील विसर्ग अजून बंदच आहे.पश्चिम भागात मागील आठवडाभर पावसाची उघडझाप सुरू होती. तसेच काही भागात पावसाची दडी होती. मात्र, शनिवारपासून चांगल्या पावसाला सुरूवात झाली. रविवारीही कोयनानगरसह नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणेाली भागात चांगलाच बरसला. त्यामुळे पावसाचा रुसवा गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पावसामुळे पुन्हा ओढे, ओहोळ भरुन वाहू लागले आहेत. तसेच भात खाचरातही पाणी साचल्याने भात पिकाला फायदा होणार आहे. तर पश्चिम भागातीलच धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी या धरणातही हळूहळू पाणी आवक वाढत आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे २५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नवजाला ४५ आणि महाबळेश्वर येथे ५३ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. एक जूनपासूनचा विचार करता सर्वाधिक पावसाची नोंद नवजाला ४६११ मिलीमीटर पडलेला आहे. तर महाबळेश्वरमध्ये ४२८१ आणि कोयानानगरला आतापर्यंत ३२३१ मिलीमीटर पाऊस झाला. कोयनाक्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणात आवक वाढली आहे.

सकाळच्या सुमारास धरणात ४३११ क्यूसेक वेगाने पाणी येत हेाते. तर धरण पाणीसाठा ८३.७३ टीएमसी झालेला. धरण भरण्यासाठी अजुनही जवळपास २१ टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यातच १८ आॅगस्टनंतर पावसाचा जोर वाढणार असल्याने धरण भरण्यास सप्टेंबरपर्यंतची प्रतीक्षा करावी लागेल असा अंदाज आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण