साताऱ्यात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 23:05 IST2018-06-01T23:05:04+5:302018-06-01T23:05:04+5:30

Rain accompanied with thundershowers in Satara | साताऱ्यात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

साताऱ्यात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी


सातारा : साताºयासह जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर कडक ऊन पडले होते.
तसेच वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार
पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे सातारकरांची चांगलीच पळापळ झाली.
जिल्ह्यातील बहुतांश भागास गेल्या
वादळी वाºयासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. वाºयामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली तर रस्त्याकडेची झाडे, फांद्या पडल्याने अनेक मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान, शुक्रवारी सकाळपासूनच कडक ऊन पडले होते. वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत असल्याने अंगाची लाहीलाही होत होती. सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक काळे ढग जमा झाले. त्यानंतर मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. शाळा काही दिवसांत सुरू होणार असल्याने बाजारपेठेत शालेय साहित्य विक्रीसाठी आले आहेत. पावसामुळे त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ते झाकून ठेवण्यासाठी विक्रेत्यांची धावपळ उडाली.
विजेचा लपंडाव
शहरातील सर्वच भागात रात्री उशिरापर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता. सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
वादळी वाºयामुळे भिंत पडून तिघे जखमी
वादळी वाºयासह पावसामुळे अंबवडे संमत वाघोली, ता. कोरेगाव येथील नवीन बांधकामाची भिंत शेजारील घरावर पडली. त्यामध्ये तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रत्नाबाई धनाजी संकुडे (वय ३५), प्रथमेश धनाजी संकुडे (१६) व सविता काशिनाथ संकुडे (६० तिघे रा. अंबवडे संमत वाघोली) अशी जखमींची नावे आहेत.

Web Title: Rain accompanied with thundershowers in Satara