साताऱ्यातील विविध ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:39 IST2021-01-13T05:39:32+5:302021-01-13T05:39:32+5:30

सातारा : शाहूपुरी पोलिसांनी शहरामध्ये विविध ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांवर गुन्हा दाखल केला. मंगळवार पेठेतील मंदिराच्या ...

Raids on gambling dens at various places in Satara | साताऱ्यातील विविध ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे

साताऱ्यातील विविध ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे

सातारा : शाहूपुरी पोलिसांनी शहरामध्ये विविध ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांवर गुन्हा दाखल केला. मंगळवार पेठेतील मंदिराच्या शेजारील बोळातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा सुमारे ३७५ रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी स्वरुप विजय कांबळे (रा. मंगळवार पेठ) व समीर सलीम कच्छी (रा. यश ढाब्याच्या पाठीमागे, मोळाचा ओढा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई समर्थ मंदिर चौकातील पानटपरीत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर करण्यात आली. याप्रकरणी सचिन विष्णू नलवडे (रा. मंगळवार पेठ), शुभम महेंद्र गंगावणे (रा. करंडी, ता. सातारा), यासीन इकबाल शेख (शनिवार पेठ) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा सुमारे ८३७ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तिसरी कारवाई बसस्थानक परिसरात करण्यात आली. याप्रकरणी संतोष बजरंग देशमुख (रा. लक्ष्मीटेकडी), यासीन इकबाल शेख (रा. शनिवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत ३५५ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Web Title: Raids on gambling dens at various places in Satara