साताऱ्यात दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:20 IST2021-02-05T09:20:32+5:302021-02-05T09:20:32+5:30
सातारा : शहर व परिसरात सुरू असणाऱ्या दोन ठिकाणच्या जुगार अड्ड्यांवर छापा टाकून पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला. रविवार ...

साताऱ्यात दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे
सातारा : शहर व परिसरात सुरू असणाऱ्या दोन ठिकाणच्या जुगार अड्ड्यांवर छापा टाकून पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला.
रविवार पेठेतील अन्नपूर्णा वडापाव सेंटरजवळ पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत एक हजार रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. उमेश उत्तम तपासे (वय ३२, रा.मल्हार पेठ, सातारा), महेश सूर्यकांत बल्लाळ (वय ५३, रा.अंजली कॉलनी, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. साईबाबा मंदिर कमानीचे शेजारी विजय हाइट्ससमोर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी शाहीर शब्बीर सय्यद (वय २२, रा. बुधवार पेठ, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल केला. या कारवाईत दोन हजार ३५२ रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या दोन्ही कारवाया सातारा शहर पोलिसांनी केल्या आहेत.