जुगार खेळणाऱ्यांवर छापा; शिंदेवाडीत ९ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:39 IST2021-04-20T04:39:38+5:302021-04-20T04:39:38+5:30
पुसेगाव : पुसेगाव पोलिसांनी खटाव तालुक्यातील शिंदेवाडी (ललगुण) येथील तळे नावाच्या शिवारात रविवारी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ९ जणांविरुद्ध ...

जुगार खेळणाऱ्यांवर छापा; शिंदेवाडीत ९ जणांवर गुन्हा
पुसेगाव :
पुसेगाव पोलिसांनी खटाव तालुक्यातील शिंदेवाडी (ललगुण) येथील तळे नावाच्या शिवारात रविवारी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत चार मोबाईल, जुगाराचे साहित्य, पाच दुचाकी व रोख रक्कम असा एकूण १ लाख ७३ हजार १२० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदेवाडी येथील तळे नावाच्या शिवारात विजय जयसिंग भोसले (रा. अनपटवाडी) यांच्या मालकीच्या आंब्याच्या झाडाखाली जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, पोलीस शिपाई ज्ञानेश्वर यादव, मुंडे, मुल्ला, मुंडे यांनी छापा टाकला. याप्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध पुसेगाव पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.