वाठार किरोली येथे अवैध दारू धंद्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:29 IST2021-05-30T04:29:34+5:302021-05-30T04:29:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथे अवैध दारू धंद्यावर पोलिसांनी छापा टाकून दारूचे पंधरा बॉक्स ...

Raid on illegal liquor business at Wathar Kiroli | वाठार किरोली येथे अवैध दारू धंद्यावर छापा

वाठार किरोली येथे अवैध दारू धंद्यावर छापा

लोकमत न्यूज नेटवर्क

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथे अवैध दारू धंद्यावर पोलिसांनी छापा टाकून दारूचे पंधरा बॉक्स व ५४ हजार ८४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दारू विक्रीप्रकरणी एकावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय अभिमान धोंडगे (वय २४, रा. वाठार किरोली, ता. कोरेगाव) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. शुक्रवारी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, रहिमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांनी पथकाबरोबर वाठार ते तारगाव रस्त्याकडेला ऊसाच्या शेतात सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यावर छापा टाकला. यावेळी घटनास्थळी विजय धोंडगे हा चोरटी दारु विक्री करताना सापडला. त्याच्याकढून देशी व विदेशी दारूचे पंधरा बॉक्स व ३ हजार ७५० रूपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.

जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलीस हवालदार कुलकर्णी, यच्नी सहभागी झाले होते.

Web Title: Raid on illegal liquor business at Wathar Kiroli