साताऱ्यात दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:20 IST2021-02-05T09:20:43+5:302021-02-05T09:20:43+5:30
सातारा: शहर पोलिसांनी शहरात सुरू असलेल्या दोन ठिकाणच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एक ...

साताऱ्यात दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा
सातारा: शहर पोलिसांनी शहरात सुरू असलेल्या दोन ठिकाणच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एक कारवाई देगाव फाट्यावरील पालकर मटन सेंटरच्या शेजारी तर दुसरी कारवाई सातारा चिकन सेेंटरलगतच्या पत्र्याच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर झाली आहे. या कारवाईत जुगार साहित्य आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.
देगाव फाट्यावरील एका दुकानाच्या शेजारी पत्र्याच्या शेडला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सातारा शहर पोलिसांनी ३ हजार रुपयांची रोकड आणि जुगार साहित्य जप्त केले. याप्रकरणी प्रवीण उत्तम कणसे (वय ४७, रा. अंगापूर वंदन, ता. सातारा) आणि जुगार अड्डामालक समीर कच्छी (रा. मोळाचा ओढा, सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा चिकन सेेंटरलगतच्या पत्र्याच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून दोघांवर गुन्हा दाखल केला. गणपत दगडू कुंभार (वय ६०, रा. श्रीनगर कॉलनी, तामजाईनगर सातारा) आणि जुगार अड्डामालक चंदू चोरगे (रा. रविवार पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून, या कारवाईत पोलिसांनी १७५९ रुपयांची रोकड आणि जुगार साहित्य जप्त केले आहे.